आर्ट देश द स्टुडीओ हे कलादालन नेहमीच समकालीन कलाविष्काराना प्रदर्शनामार्फत न्याय देत आले आहे. आता पुन्हा एकदा आर्ट देश द स्टुडओ यांनी एक वेबस्टोअर्स सुरु केले आहे. चिरू चक्रवर्ती, डॉ सुबोध केरकर, वृदावन सोलंकी, सोमनाथ होरे, गौतम पाटोळे, अंकित पटेल, तीर्थंकर विश्वास असे अनेक नामाकित कलेविषयी प्रेम असणारे एकत्रित आले आणि त्यांनी या उपक्रमातर्फे स्कल्प्चर पेंटींग्ज आणि फोटोग्राफ्स हे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून तुम्ही ते खरेदी करून शकता आणि त्याबद्दल आपले वैयक्तीक मतही नोंदवू शकता. हे कलाप्रदर्शन दिनांक २७ मे ते १५ जून २०१५ पर्यंत आर्ट देश द स्टुडीओ वाळकेश्वर येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्रप्रेमींना मोफत पहावयास मिळणार आहे.
आजच्या युगात पहिल्यांदाच असे घडत आहे कि या वेबस्टोअर्सद्वारे आपण त्या कलाकाराशी संपर्क साधू शकता व त्याला त्याच्या कलेची पोचपावती देऊ शकता. आर्टकल्चर डॉट कॉमवर सर्व कलासंस्कृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या वेबसाईटवर एबस्त्राक्ट, शिल्पकला, फोटोग्राफी, फिगरेटीव अशा आणि वेगवेगळ्या कलेचे प्रकार एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहे. आर्ट देशचे कुशाग पटेल याच्या म्हणण्यानुसार “कलाकृती ही नेहमी आनंद्च देते. पण जेव्हा आपण एखादी कलाकृती स्टुडियोत पाहतो ती फक्त आपल्या स्मृतीपटलावर फक्त ५ सेकंदासाठी राहते आणि पुन्हा आपल्याला पहावयाची असेल तर आपण ती बघू शकत नाही. तेव्हा ती आपण आपल्या वेबसाईटवर बघू शकतो आणि त्याचा पुन्हा आस्वाद घेऊ शकतो. या द्वारे आपण भूत वर्तमान भविष्य काळाशी संपर्क साधू शकतो.”
दिनांक /वेळ : २७ मे ते १५ जून २०१५ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
ठिकाण : आर्ट देश द स्टुडीओ, व्हाईट हाउस अनेक्स ९१ वाळकेश्वर मुंबई
वेब स्टोअर : www.artkultr.com