९ ते १५ जूनदरम्यान चित्रप्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार बाबूभाई धनानी यांच्या ‘ओम’कार चित्रकृतींचं प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये ९ जूनपासून सुरु होत असून, ते १५ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे.
चित्रकार बाबूभाई धनानी यांनी चित्रकलेचं शिक्षण अहमदाबाद आणि मुंबईच्या जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून पुंर्ण केले असून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवीही संपादन केली आहे. शिल्पकृतीमधलं राष्ट्रीय स्थरावरील पुरस्कार प्राप्त केलेल्या या कलाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुतळे विक्रमी संखेत तयार केले आहेत. अध्यात्मिक अंगाची ओढ असलेल्या या कलाकाराने स्वत:च्या साधनेतून अलिकडच्या काळात साकार झालेल्या काही चित्रांचं प्रदर्शन रसिकांसाठी पेश केलं आहे. अध्यात्मिक साधनेसाठी लक्षकेंद्रीत करणार्या या कलाकृती या चित्रकाराने आपल्या अनुभवातून चित्रबद्ध केल्या आहेत.