‘फादर्स डे’निमित्त ‘कॅरी ऑन मराठा’तील गश्मिर महाजनीचा वडिलांच्या कार्याला सलाम!
‘बाबांनी या क्षेत्रात उभं राहण्यासाठी केलेली धडपड संघर्ष प्रेरणादायी आहे. . वेळोवेळी त्यांच्याकडून मिळणारं प्रोत्साहन आणि विश्वास माझ्यात उर्जेप्रमाणे काम करत असतो. कोणीही गॉड फादर नसताना त्यांनी ज्या पँशनेटली या क्षेत्रात येऊन स्वतःच अस्थित्व निर्माण केलं त्यासाठी त्यांना सेल्यूट! बहुतेक म्हणूनच अभिनयाचं पँशन मला बाबांकडून मिळालं.’

बाप-लेकाच्या नात्याचे अनेक पैलू उलगडताना गश्मीर म्हणाला बाबांचा एक फ्रेंड, फिलॉसोफार आणि गाईड म्हणून नेहमीच मला भक्कम पाठींबा होता आणि राहील याची सातत्याने जाणीव मला होत होती. माझ्या मीच चुका करव्यात, स्वतः अनुभव घेत मोठं व्हावं असंच त्यांना वाटतं. ‘मुंबईचा फौजदार’ नंतर बाबांनी सिनेमातून काम करणं थांबवलं. त्यामुळे घरात सिनेमाबाबतची तशी रेलचेल कमीच होती. कधी कोणत्या समारंभात किंवा पार्टीत गेल्यावर बाबांना मिळणारी ओळख आणि प्रतिष्ठा पाहून त्यांनी इतकी वर्ष काम केलेल्या क्षेत्राबद्दल कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली. पुढे जगभरातील सिनेमे पाहणं, पुस्तकांच वाचन आणि प्रायोगिक नाटकांमधून अभिनय शिकण्याचा सिलसिला सुरु झाला. त्यांच्या अभिनयाचा सहवास मला खूप काळ मिळाला नाही पण त्यांची काम करण्याची पद्धत, हार्डवर्क आणि स्वतःच्या फिटनेसबाबत घ्यायच्या काळजीसाठी त्यांनाच मी माझा हिरो मानतो.’

गश्मीर आणि रवींद्रजी यांच्या मधील बाप मुलाचं नातं हे अगदी तुमच्या आमच्या सारखंच आहे किंबहुना अधिक खेळीमेळीचं, स्वतंत्र आणि पाहून हेवा वाटेल असं. शुटींगच्या तारखा वगळता मिळालेल्या वेळ गश्मीर फक्त त्याच्या कुटुंबासोबत घालवतो. तो म्हणतो, ‘एकत्र चहा घेत असताना बाबा ब-याच वेळा नॉस्टेलजिक होतात मग पूर्वीच्या वेळचे किस्से हळू हळू शेअर होतात. कधी मी आणि आई एक टीम होऊन बाबांची गंमत करतो तर मी आणि बाबा मिळून आईची फिरकी घेतो. ब-याच विषयांवर आम्ही चर्चा करतो. सिनेमा आम्हा दोघांच्या आवडीचा विषय. ही इज माय बेस्ट आयडीयल !’
तसं असलं तरीही गश्मीर स्वतःच्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करू इच्छितो. त्याच्या बाबांमधील आणि त्याच्यातील अभिनयाच्या लकबीच साधर्म्य दाखवण्याकडे त्याचा कल नसून त्यांच्या नैसर्गिक अभिनयावर आणि मेहनतीचं कौतुक करावं अशी भूमिका ठेवतो.