बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त नाटयसंगीताचा नजराणा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त ʻनाटयगीत रंगʼ मराठी नाटयसंगीताचा नजराणा शुक्रवार २६ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे नव्या दमाचे युवा गायक सादर करणार आहेत.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व या नावाचे गारुड नव्या पिढीपर्यत कायम आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भावविश्व समृध्द करणा‐या लोकप्रिय नाटयगीतांचा ʻनाटयगीत रंगʼ हा कार्यक्रम शुभदा दादरकर सादर करणार आहेत. यात श्रिया सोंडूर, मयुर सुकाळे, प्रेरणा दामले, श्वेता जोगळेकर, अमोल पटवर्धन, धनश्री गाडगीळ नाटयगीते सादर करतील. पं.विश्वनाथ कान्हेरे ऑर्गनवर तर हेरंब जोगळेकर हे तबल्यावर साथ करतील. हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य आहे.