मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थ प्लसचा उपक्रम
इंडस हेल्थ प्लस प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कंपनीने आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबवला. या शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे उद्दिष्ट म्हणजे स्व:तच्या आरोग्याची जाणीव करुन देणे, कोणताही आजार प्राथमिक अवस्थेत बरा होणे आवश्यक असते, वेळच्यावेळी सर्व तपासण्या करुन घेणे याची जाणीव करुन देणे हा होता. हे शिबिर रविवार दि.२ ऑगस्ट रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी सभागृह येथे सकाळी ९ ते सांय ६ वाजेपर्यंत होते. यावेळी संपूर्ण फिटनेस चाचणी करण्यात आली.
या शिबिराचा भाग म्हणून अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॅमेरामन, तंत्रज्ञ आणि स्पॉट बॉईज यांसारख्या १२० जणांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करुन घेतली. या शिबिरात कलाकार जयवंत वाडकर, विजय कदम, पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम, दीपाली सय्यद, जितेंद्र जोशी, अदिती सांरंगधर, मानसी नाईक, सुशांत शेलार, उदय टिकेकर, सुनिल गोडबोले, हेमलता बाने या दिग्गज कलाकरांचा समावेश होता. आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच संचालक मंडळ इंडस हेल्थ प्लसचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर पर्णल देखने, गव्हनींग कौन्सिल मंदार नाईकवडी व या उपक्रमाचे समन्वयक लिड मिडियाचे विनोद सातव हे देखील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पु.ल.देशपांडे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे होते.
महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या, मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत अहोरात्र काम करणा-या सदस्यांसाठी आरोग्य तपासणीचा अनोखा उपक्रम प्रथमच केल्याबद्द्ल मी इंडस हेल्थप्लसचे आभार मानते व महानगरपालिकेडून काही मदत लागल्यास आम्ही नक्की करु असे जाहीर केले.
प्रमुख पाहुणे आशुतोष घोरपडे यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले व अशा विषयांवर काम करण्यांची इच्छा व्यक्त केली. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या धावपळीच्या जीवनात आमच्याकडून आरोग्याची नियमित काळजी घेतली जात नाही परंतु या उपक्रमामुळे आम्हांला आरोग्यांची काळजी घेणे आवश्यक आहे यांची जाणीव झाली, असे ते म्हणाले.
इंडस हेल्थप्लसचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर पर्णल देखणे म्हणाले की, गेली १५ वर्ष आमची कंपनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे, मुंबई अशा विविध शहरात त्याचबरोबर संपूर्ण देशांत आमचे नेटवर्क सध्या कार्यरत आहे. भविष्यात इतरशहरांमध्ये अनेक उपक्रम करण्याची आमची तयारी आहे असे त्यांनी सांगितले. चोवीस तास कार्यरत राहण्याच्या विचाराने माध्यमातील कर्मचारी वर्गामध्ये आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष दिसून येतात, ताणतणाव वाढलेला दिसून येतो. हा तणाव दूर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत्ते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला आम्ही कायमच सहकार्य करत राहू असेही ते म्हणाले.