खिळली नजर २२ ऑगस्टच्या सोहळ्यावर!
मॅारिशसला साजरा होणाऱ्या ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरू झाली असून मराठी चित्रपटसृष्टीतील एकूण ३१ विभागांसाठी नामांकने जाहीर झाले आहेत. त्यातील अजिंक्यातारे कोण ठरणार यावर मराठी चित्रपट सृष्टीची नजर खिळली असून, २२ ऑगस्टला पुरस्कार सोहळ्यात विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे.
‘सुपरविस्टा एंटरटेण्मेंट’ आयोजित ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळ्याची चित्रपट विभागाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठीतील अनेक कलाकारांची उपस्थिती होती. अंतिम फेरीसाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, डॉ प्रकाश बाबा आमटे, किल्ला, या चित्रपटांमध्ये चुरस आहे; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नाना पाटेकर (डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो), सचिन खेडेकर (नागरिक), सुमीत राघवन (संदुक), यांच्यात चुरस आहे. सर्वोत्कृष्ट नायिकेसाठी अमृता सुभाष ( किल्ला), नंदिता धुरी (एलिझाबेथ एकादशी), सोनाली कुलकर्णी (डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो) यांना नामांकन मिळाले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अभिजीत पानसे (रेगे), अविनाश अरुण (किल्ला), परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी) यांचे नामांकन करण्यात आले आहे.
इलेक्ट्रोनिक मतदान पद्धतीने पुरस्कारपात्र कलाकृतीची व कलाकारांची निवड परीक्षकांनी केली असून यासाठी भरत दाभोळकर, महेश कोठारे, नीना कुलकर्णी, भरत जाधव, अलका कुबल, अशोक पत्की, वैशाली सांमत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. इंडिपेंडेट वेलिडेशन एजन्सीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मॅारिशसला होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात इंडिपेंडेट वेलिडेशन एजन्सीतर्फे या निवड प्रक्रियेचा खुलासा करण्यात येईल. प्रेक्षक पसंतीच्या पुरस्कारासाठी ऑनलाईन वोटिंग ठेवण्यात आली असून www.ajinkyataraawards.com. या वेबसाईटवर प्रेक्षकांना आपलं मत नोंदवता येणार आहे. लोकप्रिय अजिंक्यतारा चित्रपट, लोकप्रिय अजिंक्यतारा अभिनेता व लोकप्रिय अजिंक्यतारा अभिनेत्री या तीन विभागासाठी प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार ठेवण्यात आला आहे.
‘अजिंक्यतारा’ या आगळ्या वेगळ्या ग्लॅमरस पुरस्काराची ब्रँड अॅम्बेसेडर लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. पुरस्कार सोहळ्यांतून करमणूक विश्वातल्या गुणवत्तेचं कौतुक होत असतंच पण नव्या येणाऱ्या टॅलेंटला वाव देण्यासाठी सुपरविस्टा एंटरटेण्मेंट’ कंपनीच्या माध्यमातून ३१ जुलैला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातून नृत्यासाठी सोनाली पवार गायनासाठी हरिसिंग ठाकूर, व प्रतीक बसवराज सलगर या तीन युवा गुणी कलाकारांची निवड झाली असून मॅारिशसला होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात या तिघांना चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसोबत परफॉर्म करण्याची संधी मिळणार आहे.

अजिंक्यतारा’ या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी चित्रपटसृष्टी उत्सुक असून या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारांमध्ये बाजी कोण मारणार? याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. प्रवासादरम्यान होणाऱ्या प्रदूषणावर उतारा म्हणून जेवढं इंधन खर्च होईल. तेवढे वृक्ष लावण्याचा अनोखा उपक्रमही या सोहळ्याच्या निमित्ताने केला जाणार आहे. हे पुरस्कार २२ ऑगस्टला मॅारिशसच्या स्वामी विवेकानंद कन्व्हेशन सेंटर येथे चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचे डोळे या वर्षांतील पहिल्यावहिल्या ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळ्याकडे लागले आहेत.
अजिंक्यतारा नामांकने
सर्वोत्कृष्ट चित्रपट
१) डॉ.प्रकश बाबा आमटे
२) एलिजाबेथ एकादशी
३) किल्ला
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
१) अभिजित पानसे – रेगे
२) अविनाश अरुण – किल्ला
३) परेश मोकाशी – एलिजाबेथ एकादशी
सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार
१) नाना पाटेकर – डॉ.प्रकश बाबा आमटे
२) सचिन खेडेकर – नागरिक
३) सौमित राघवन – संदूक
सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार
१) अमृता सुभाष – किल्ला
२) नंदिता धुरी – एलिजाबेथ एकादशी
३) सोनाली कुलकर्णी – डॉ.प्रकश बाबा आमटे
लोकप्रिय चित्रपट
१) क्लासमेट
२) एलिजाबेथ एकादशी
३) लई भारी
४) पोस्टर बॉईज
५) टाईमपास – २
लोकप्रिय अभिनेता
१) अकुंश चौधरी – क्लासमेट
२) जितेंद्र जोशी – काकण
३) रितेश देशमुख – लई भारी
४) स्वप्नील जोशी – मितवा
५) सुबोध भावे – लोकमान्य
लोकप्रिय अभिनेत्री
१) अमृता सुभाष – किल्ला
२) सोनाली कुलकर्णी – डॉ.प्रकश बाबा आमटे
३) सोनाली कुलकर्णी – मितवा
४) उर्मिला कोठारे – काकण
५) सई ताम्हणकर – क्लासमेट
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार
१) आदिनाथ कोठारे – साटलोट
२) भरत जाधव – अग बाई अरेच्या -२
३) हृषिकेश जोशी – पोस्टर बॉईज
सहाय्यक अभिनेता
१) आदिनाथ कोठारे – अवताराची गोष्ट
२) अंकुश चौधरी – क्लासमेट
३) पुष्कर श्रोत्री – रेगे
सहाय्यक अभिनेत्री
१) प्राथना बेहेरे – मितवा
२) सई ताम्हणकर – क्लासमेट
३) स्मिता तांबे – कॅण्डल मार्च
निगेटिव्ह भूमिका
१) प्रसाद ओक – रमा माधव
२) शरद केळकर – लई भारी
३) सिद्धार्थ जाधव – ड्रीम मॉल
सर्वोत्कृष्ट संगीतकार
१) अजय सिंघ – काकण
२) अजय – अतुल – लई भारी
३) निशाद गोलाबरे – अग बाई अरेच्या -२
सर्वोत्कृष्ट गीतकार
१) अशोक बागवे / गुलजार लावणी – संदूक
२) गुरु ठाकूर / माउली माउली – लई भारी
३) अवधूत गुप्ते – देव तुझ्या – एक तारा
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
१) रोहन उत्तेकर – टपाल
२) सायली भांडारकवठेकर – एलिजाबेथ एकादशी
३) श्रीरंग महाजन – एलिजाबेथ एकादशी
नवीन पदार्पण पुरुष
१) आरोह वेलणकर – रेगे
२) श्रीकांत भिडे – ‘व्हॉट अबाऊट सावरकर
नवीन पदार्पण स्त्री
१) पल्लवी पाटील – क्लासमेट
२) उर्मिला निंबाळकर – एक तारा
सर्वोत्कृष्ट पटकथा
१) अभिजित पानसे – रेगे
२) मधुगंधा कुलकर्णी , परेश मोकाशी – एलिजाबेथ एकादशी
३) शिरीष लाटकर – मितवा
सर्वोत्कृष्ट संवाद
१) अभिजित पानसे / प्रवीण तरडे – रेगे
२) डॉ.प्रकश बाबा आमटे / समृध्दी पोरे – डॉ.प्रकश बाबा आमटे
३) महेश केळुसकर – नागरिक
सर्वोत्कृष्ट संकलन
१) आरिफ शेख – लई भारी
२) दिनेश पुजारी – रेगे
३) फैसल – इम्रान – क्लासमेट
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक
१) धनंजय मोंडल – लई भारी
२) नितीन देसाई – राम माधव
३) संतोष फुटाणे – लोकमान्य
सर्वोत्कृष्ट गायक
१) अजय गोगावले – माऊली माऊली – लई भारी
२) शंकर महादेवन – मितवा टायटल ट्रॅक – मितवा
३) स्वप्निल बांदोडकर – चांद तू नभात – संदूक
सर्वोत्कृष्ट गायिका
१) जान्हवी अरोरा – सावर रे – मितवा
२) नेहा राजपाल – काकण टायटल ट्रॅक – काकण
३) वैशाली सामंत – दिल मेरा अगं बाई अरेच्या-२
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
१) आदित्य बेडेकर – कॉफी आणि बरंच काही
२) माँटी शर्मा – रेगे
३) टबी – परीक – नागरिक
सर्वोत्कृष्ट कथा
१) अभिजित पानसे – रेगे
२) मधुगंधा कुलकर्णी – एलिजाबेथ एकादशी
३) नितीन दिक्षित – अवताराची गोष्ट
सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
१) मोहनदास व्हीपी – किल्ला
२) प्रमोद चंदुरकर – लोकमान्य
३) रसूल पुकूटी – नागरिक
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
१) महेश शेरला – लोकमान्य
२) मितल गंत्र – साटलोट
३) पूर्णीमा ओक – राम माधव
साहस दृश्य
१) कौशल मोसिश – लई भारी
२) मनोहर वर्मा — क्लासमेट
३) सिल्वा – बाजी
स्पेशल इफेक्ट
१) ओम कमल – अ पेइंग घोस्ट
२) टूल बॉकस स्टुडिओ – बाजी
३) विश्वास सवनूर – संदूक
नृत्यदिग्दर्शक
१) उमेश जाधव – क्लासमेट
२) सुजीत आणि फुलवा खामकर – मितवा
३) उमेश जाधव – टाईमपास २
रंगभूषाकार
१) प्रताप बोराडे – काकण
२) विक्रम गायकवाड – लोकमान्य
३) विनय सूर्यवंशी – रमा माधव
छायांकन
१) अविनाश अरुण – किल्ला
२) लक्ष्मण उत्तेकर – टपाल
३) प्रसाद भेंडे – लोकमान्य