सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषदेचा उपक्रम
विज्ञान परिषद गेली ५० वर्ष सातत्याने विज्ञान प्रसार व प्रचारचे काम करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात विज्ञान तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न परीषद करणार आहे यासाठी राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वैज्ञानिक आणि शोध ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे. शास्त्रीय शोधाच्या जन्मकथांवर आधारित एकांकिकांचा समावेश असावा. विक्रम साराभाई, डॉ. सीव्ही रमन, मादाम क्यूरी, आईनस्टाइन, आर्कीमिडीज, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञाना संशोधन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रयोग करताना मनातील विचारांची घालमेल, अथक प्रयत्न इत्यादी घटना व प्रसंगांवर आधारित एकांकिका असावी मात्र शास्त्रज्ञांचे जीवनचरित्र नसावे.
गेली ४९ वर्षे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरिल गावांत शहरात विज्ञान अधीवेशनाचे आयोजन केले जाते . दि ८ ते ११ जानेवारी २०१६ या चार दिवसात परीषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन मुंबईत संपन्न होणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाविद्यालय व संस्थेतील कलाकारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे संस्थेच्या http://www.mavipamumbai.org वेबसाईटवर आणि कर्यालयात अर्ज व नियमावली उपलब्ध आहे. स्पर्धेतील एकांकिकांचे परीक्षण कलाक्षेत्रातील मान्यवर व विज्ञान क्षेत्रातील मान्यवर शास्त्रज्ञ करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह डॉ. जयंत जोशी यांनी एका प्रसिधीपत्रका व्दारे दिली आहे
एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश फी रूपये २०० असून ‘वैज्ञानिक आणि शोध’ ही या एकांकिका स्पर्धची मध्यवर्ती संकल्पना आहे. यात अंधश्रद्धा, पर्यावरण किंवा प्रदूषण, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय असावेत. स्पर्धा एकूण दोन फे-यात होईल. प्राथमिक फेरी विभाग पातळीवर (मुंबई, सांगली, नाशिक, औरंगाबाद, नागपूर) येथे होईल. या फेरीत स्पर्धक आपली एकांकिका कुठल्याही तांत्रिक सहकार्याशिवाय सादर करतील. (उदा. नेपथ्य, प्रकाश, वेशभुषा, रंगभूषा इत्यादी) अंतिम फेरीत एकांकिका सादरीकरणासाठी स्पर्धक तांत्रिक बाबींचा वापर करू शकतील. सादर झालेल्या एकांकिकांमधून तीन एकांकिका निवडण्यात येतील. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख आत्ता ३१ ऑक्टोबर असून प्राथमिक फेरी १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होईल. स्पर्धेची अंतिम फेरी डिसेंबर २०१५च्या दुस-या आठवड्यात असेल.
प्रयोग २५ मिनिटांपेक्षा कमी आणि ३५ मिनिटांपेक्षा जास्त असू नये. स्पर्धेत सादर होणार्या प्रयोगाचे संपूर्ण अथवा अंशतः चित्रीकरण करण्याचा अधिकार मराठी विज्ञान परिषदेला राहील.
सर्वोत्कृष्ठ लेखनासाठीचे बक्षीस रोख रूपये १००० आणि प्रमाणपत्र स्पर्धेसाठीच लिहिल्या गेलेल्या एकांकिकेला दिले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रोख रूपये २००० आणिे प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीस प्रत्येकी रूपये १००० आणि प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी रोख रूपये १००० प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी रोख रूपये १००० व प्रमाणपत्र, प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला रूपये १००००, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाच्या एकांकिकेला रूपये ७५००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाच्या एकांकिकेला रूपये ५०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप असेल. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व) मुंबई – ४०००२२ office@mavipamumbai.org येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : ०२२-२४०५४७१४, ०२२-२४०५७२६८