ज्येष्ठ रंगकर्मी नानासाहेब बोझावार स्मृतिप्रित्यर्थ ‘चंद्रपूर करंडक’
चंद्रपुरातील ज्येष्ठ रंगकर्मी विलास उपाख्य नानासाहेब बोझावार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शील प्रॉडक्शन आणि आम्ही चंद्रपूरकर या संस्थांच्या वतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम कलावंत घडावे आणि एकांकिकेबाबत रंगकर्मीमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे अशी कै. नानांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ `चंद्रपूर करंडक’ एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची बक्षीसे जाहीर करण्यात आली असून, चंद्रपुरात या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील नाटय़कर्मींचा रंगसोहळा साजरा साजरा होणार आहे.
संपर्क : डॉ. जयश्री कापसे-गावंडे ९८२२५७१७७४, अजय धवने ९८२२५६५९२६, सुशील सहारे९३७०३२४७७०
स्पर्धेची नियमावली
१) ही स्पर्धा फक्त मराठी भाषेतील एकांकिकांसाठीच असून खुली स्पर्धा आहे.
२) कुठल्याही संस्थेला यात सहभागी होता येतील.
३) ही स्पर्धा फक्त हौशी कलाकारांसाठीच आहे.
४) प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2015 आहे.
५) स्पर्धा २, ३, ४ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथेआयोजित केल्या जातील.
६) लॉटनुसार एकांकिका सादर करावी लागले. कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
७) स्पर्धकांच्या एक दिवसाच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येईल.
८) स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु. १०००/- असून चंद्रपूर येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रवेशिका व डी.डी.स्वीकारले जातील. ड्राफ्ट `शील प्रॉडक्शन, चंद्रपूर‘ या नावाने काढावा.
९) एकांकिका सादरीकरणासाठी एक तास वेळ दिला जाईल. या वेळात संपूर्ण नेपथ्य, प्रकाश योजना वइतर तयारी करून एकांकिका सादर करून पुन्हा नेपथ्य काढणे अपेक्षित आहे. म्हणजेच एकांकिकेचेप्रत्यक्ष सादरीकरण कमीत कमी ३०मिनिटे व जास्तीत जास्त ४५ मिनिटे इतके अपेक्षित आहे. याचीअंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल.
१०) मर्यादित संघांनाच प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेशिका स्वीकारण्याचा संपूर्ण अधिकार संयोजकांचाराहील.
११) स्पर्धेत सादर होणाऱया एकांकिकेच्या लेखकाची परवानगी, सेन्सॉरची नोंदणी याची जबाबदारी स्पर्धकसंघावर असेल. याला आयोजक जबाबदार असणार नाहीत.
१२) प्रवेशिकेसोबत एकांकिकेच्या संहितेच्या तीन प्रती पाठविणे बंधनकारक आहे. प्रवेशिकेसोबतलेखकाची परवानगी व सेन्सॉर नोंदणीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
१३) आयोजकांचे मार्फत निळा पडदा, सहा लेव्हल्स,दोन जनरल हजार वॅट, आठ स्पॉट, सहा डीमर,विनामूल्य पुरवण्यात येतील. अतिरिक्त साहित्यासाठी निर्धारित शुल्क द्यावे लागेल.
१४) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१५) स्पर्धेसाठीचे नियम व अटी तसेच कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकारआयोजकांकडे राहतील.
स्पर्धेतील बक्षीसे
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – ५० हजार रु. रोख व करंडक
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – ३० हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – २० हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम – १० हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय – ७ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तृतीय – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) प्रथम – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) द्वितीय – ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) तृतीय – २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) प्रथम – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)द्वितीय – ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री)तृतीय – २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट नेपथ्य द्वितीय – ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय – २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना द्वितीय – ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्टप्रकाशयोजना तृतीय – २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन प्रथम – ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन द्वितीय – ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन तृतीय – २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट नवोदित लेखक – विशेष पारितोषिक ५ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार – विशेष पारितोषिक ३ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट बाल कलावंत – विशेष पारितोषिक २ हजार रु. रोख व स्मृती चिन्ह
प्रवेश अर्ज