निर्मला सिंग आणि जिनल गाडा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
सुप्रसिद्ध रंगलेखिका निर्मला सिंग आणि जिनल गाडा यांच्या चित्रकृतींचं प्रदर्शन हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीत २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कला रसिकांना या दोन्ही रंगलेखिकांच्या कलाकृतींचे अनोखे द्वंद्व अनुभवता येणार आहे.
निर्मला सिंह यांनी मुंबईच्या जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कला शिक्षण प्राप्त केलं आहे. आपल्या चित्रांविषयी बोलताना चित्रकार निर्मला सिंह म्हणतात, “या ब्रह्मांडात काहिच स्थिर नसून संपुर्ण ब्रह्मांड गतिशील आहे. काळाच्या उदरात अनेक गोष्टी लुप्त होतात आणि त्याच वेळी अनेक गोष्टी प्रकाशात येत असतात.” त्यांचं नेमकं सौदर्य जाणून चित्रकर्तीने त्याला कॅनव्हासवर मुर्त रुप दिलं आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्या परीने सुंदरच असते, मात्र पहाणार्याचा दृष्टीकोन त्याला त्या प्रतिमेचं सौदर्य आणि भाव यांचा वेगवेगळा अनुभव देवू शकतं. काळाच्या चक्रात जी असामान्य ताकद समावलेली आहे त्याचा वेध घेताना निर्मला सिंह यांच्या अनेक चित्रकृतींचा जन्म झाला आहे.
जिनल गाडा यांना नेहमीच भारतीय संस्कृति आणि परंपरां यांनी आकर्षित केलं आहे. जोधपूर जवळच्या ओसियां या छोट्या गावात वास्तव्यास असलेले त्यांचे पुर्वज नंतर राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरच्या कच्छमध्ये स्थलांतरीत झाले. त्यामुळे राजस्थान आणि गुजरातच्या संस्कृती आणि कलांचा मिलाफ जिनल यांच्या कलेत झालेला दिसून येतो. आताच्या बदलत्या युगात आणि वेगात भारतीय कला आणि संस्कृतीचा वारसा मागेपडत चालला आहे. चित्रकर्तीला तीच्या आजीने चुलीवर भाजलेली चपाती आणि तिची अप्रतिम चव अजून आठवते. ग्रामिण जीवनाचा अविभाज्य अंग असलेले असे प्रसंग, जत्रेतली खेळणी, लोक कलाकार, पाणी पिणारी माकडं, एकतारीवर भजन वाजवणरा वाजंत्री असे अनेक प्रसंग जिनल यांनी कॅनव्हासवर जिवंत केले आहेत.
चारकोल, तैल रंग, जल रंग आणि पेस्टलच्या सहाय्याने कॅनव्हासवर चित्रीत झालेली जिनल गाडा यांची चित्रं ग्रामिण भाग आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या मनाला घेवून जातात.


चारकोल, तैल रंग, जल रंग आणि पेस्टलच्या सहाय्याने कॅनव्हासवर चित्रीत झालेली जिनल गाडा यांची चित्रं ग्रामिण भाग आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या मनाला घेवून जातात.