श्रीनिवास नार्वेकर यांची ‘आवाज’ कार्यशाळा
संवाद कौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी ‘व्हिजन’ या संस्थेच्या वतीने १० आणि ११ ऑक्टोबरला ‘आवाज’ कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील लेक्चर हॉलमध्ये होणार असून, कार्यशाळेची वेळ सकाळी १० ते रात्री ८ अशी असणार आहे.
या कार्यशाळेसंदर्भात अधिक माहिती देणारी नियमावली अशी आहे.
१. सदर कार्यशाळा प्राथुमक स्तरावरील असून, शनिवार १० व रविवार ११ ऑक्टोबर सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत एकूण चार सत्रांमध्ये होईल. यामध्ये माईकवर बोलण्याच्या प्रशिक्षण सत्राचाही समावेश असेल. जेवणाचा अवधी एक तासाचा राहील.
२. १५ वर्षांवरील कोणालाही या कार्यशाळेत सहभागी होता येईल. सहभागी प्रत्येकाकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देण्याचा प्रयत्न असल्याने प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या तत्वावर सहभागींची संख्या मर्यादित राहील.
३. एकूण १८ तासांच्या या कार्यशाळेचे प्रवेशशूल्क ४५०० रुपये आहे. या शुल्कामध्ये दोन्ही दिवसाचे दुपारचे जेवण, सायंकाळी स्नॅक्स, चहा-बिस्किटे, मिनरल वॉटरची बाटली आणि अभ्यास साहित्य तसेच कॉन्फरन्स पॅड व पेन यांचा समावेश असेल. या प्राथमिक कार्यशाळेच्या अभ्यास साहित्यामध्ये सीडी/डीव्हीडीचा समावेश नाही.
४. प्रवेश निश्चितीकरिता अर्जासोबत प्रवेश शुल्क भरलेले असणे आवश्यक आहे. चेकद्वारे शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेशअर्ज खाली दिलेल्या `अथर्व आयुर्केअर’च्या पत्त्यावर प्रत्यक्ष घेता येऊ शकतील अथवा थेट ई-मेलद्वारे मागवता येऊ शकतील. ई-मेलद्वारे अर्ज मागवणाऱयांनी प्रवेश अर्जाची ए४ आकाराची प्रिंट काढून तो अर्ज संपूर्ण तपशीलासह भरावा व स्कॅन करून अथवा अर्जाचे मोबाईल कॅमे-याद्वारे छायाचित्र काढून visioncreative123@gmail.com या मेलवर पाठवावा.
५. प्रवेश शूल्क भरण्याच्या पद्धती
अ. प्रवेश शूल्क रोखीने जमा करावयाचे असल्यास रविवार वगळून अन्य दिवशी दुपारी १२ ते सायं. ७ या वेळेत `अथर्व आयुर्केअर, पंचकर्म क्लिनिक, बेंगाल केमिकल्ससमोर, वीर सावरकर मार्ग, सेंच्युरी बझार सिग्नलनजीकल प्रभादेवी, मुंबई-२५’ (दूरध्वनी : (०२२-२४२११४२२) येथे संपूर्ण भरलेला अर्ज, त्यावर जोडलेल्या छायाचित्रासह जमा करावा. (मात्र येथे जाण्यापूर्वी दूरध्वनीवरून पूर्वकल्पना द्यावी) प्रवेश अर्ज संपूर्ण भरणे अपेक्षित आहे.
ब. प्रवेश शूल्क नेट बँकींगद्वारे जमा करावयाचे असल्यास प्रवेशाची निश्चिती झाल्यानंतर बँक खात्याचे तपशील देण्यात येतील. मात्र प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी या व्यवहाराचा तपशील अर्जावर नमूद करणे गरजेचे आहे.
६. नाटक, सिनेमा, मालिका वा अन्य कोणत्याही माध्यमात काम वा संधी देणे किंवा स्टुडिओमध्ये सराव इ. कोणतेही आमिष `व्हिजन’ने दाखवलेले नाही. मात्र एखाद्याच्या आवाजामधले तसेच अभिनय इ. गुण ओळखून त्यांना अन्य ठिकाणी संधी देण्याचा ‘व्हिजन’चा प्रयत्न असेल.
७. प्रवेश संख्या मर्यादित असल्या कारणाने एखाद्या व्यक्तीचा सहभाग निश्चित झाल्यानंतर कोणत्याही कारणाने सहभाग रद्द झाल्यास, जमा केलेल्या प्रवेश शुल्काच्या रकमेचा परतावा मिळणार नाही.
८. सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.