नच बलिये ७ मध्ये स्वतः नृत्यावर विशेष मेहनत घेऊन हिमांशूची स्ट्रीक टीचर झालेल्या अमृता खानविलकरने ‘नच बलिये ७’ जिंकली आणि आता ‘झलक दिख ला जा’ या ‘डान्स रिआलिटी शो’मधून भेटणार आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. गोलमाल या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात करणा-या अमृताला नटरंग चित्रपटातल्या ‘जाऊ द्या न घरी’ लावणीतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्यावर आधारित असलेल्या अनेक डान्स रिआलिटी शो मधून आपल्याला तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली.
झलकच्या तीन का तडका या कन्सेप्टच्याआधारे सेलिब्रेटी गेस्ट एन्ट्री होणार आहे. आणि सेलिब्रेटी गेस्ट म्हणून अमृता खानविलकर स्पर्धक नेहा मर्दा आणि कोरीग्राफर रजित यांच्यासोबत परफॉर्म करणार आहे. बेहेने दे या रावण सिनेमातल्या गाण्यावरती हे तिघे नृत्य करणार असून तीन नद्यांचा संगम या नृत्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
झलक दिखला जा हा भाग आपल्याला येत्या शनिवारी दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता दाखवण्यात येणार आहे. येत्या वर्षात आपल्याला अमृताचे बिग बजेट सिनेमे पाहता येणार आहेत. त्यापैकी अमृता कट्यार काळजात, वन वे तिकीट, ऑटोग्राफ या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
“मला झलक मध्ये सेलिब्रेटी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं त्याचा मला खूप आनंद होत आहे. आमचा परफॉरमन्स चांगला व्हावा यासाठी नेहा, रजित आणि मीदेखील खूप मेहनत घेतली आहे. ” – अमृता खानविलकर