२, ३ आणि ४ ऑक्टोबरदरम्यान चंद्रपुरात येणार राज्यभरातील नाट्यकलावंत
आम्ही चंद्रपूरकर संस्थेद्वारे आयोजित शील प्रॉडक्शन प्रस्तुत ज्येष्ठ रंगकर्मी कै. विलास उपाख्य नाना बोझावार स्मृती ‘चंद्रपूर करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दिनांक २, ३ आणि ४ ऑक्टोबरदरम्यान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. या एकांकीका स्पर्धेला राज्यभरातील नाटय संस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून एकुण ३६ एकांकीका स्पर्धेत सादर होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. स्पर्धेचे होणार असून त्यानंतर स्पर्धेला सुरूवात होणार आहे. दिनांक २ ऑक्टोबर रोजी एम्प्लॉईज स्पोर्ट्स अन्ड रिक्रीयेशन क्लब कोराडी नागपूरतर्फे ‘एक होती आनंदी’, रंगरसिया थिएटर नागपूरतर्फे ‘पाणीपुरी’, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय नागपूरतर्फे ‘मनुशोत्ती’, तेजस्विनी बहुउद्देशिय शिक्षण संस्था नागपूरतर्फे ‘मी कोण’, जीवनज्योती कलामंच अंजनगावसुर्जीतर्फे ‘कथरसिस’, चिंतामणी पुणेतर्फे ‘लिंबु मिरची’, आय.टी. रंगकर्मी पुणेतर्फे ‘गिनीपीग’, एकलव्य युवा बहुउद्देशिय संस्था नागपूरतर्फे ‘शेवटचे स्पंदन’, अद्वैत अमरावतीतर्फे ‘माणूस माझं नाव’, अध्ययन भारती वर्धातर्फे ‘सायलेंट स्क्रीम’, सी.टी.ए. वर्धातर्फे ‘हॅलो जिंदगी’, माणुसकी बहुउद्देशिय संस्था बुलढाणातर्फे ‘गोडाऊन’ या एकांकीका सादर होतील.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी अरूणोदय नाटय कला संघ हिंगणघाटतर्फे ‘मला उत्तर हवय’, राष्ट्रभाष परिवार नागपूरतर्फे ‘मुगलांनी सत्ता दान केली’, नटराज ग्रुप पुणेतर्फे ‘मी लाडाची मैना तुमची’, टी स्कुल प्रशांत दामले फॅन्स फाऊंडेशन पुणेतर्फे ‘जनतेशी भेट माझी घडवा’, गुरूकुल फाऊंडेशन पुणेतर्फे ‘उठ सुट भावना कुट’, स्पॅडी ग्रुप ऑफ एंटरटेनमेंट अमरावतीतर्फे ‘एनीव्हर्सरी’, आबासाहेब गरवारे महाविद्यालयतर्फे ‘वर्कींग’, अभायमा प्रॉडक्शन पुणेतर्फे ‘वीसचे गणीत’, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखलीतर्फे ‘उलगुलान’, क्रिशीव क्रिएशन पुर्णेतर्फे ‘थेंबांचे टपाल’, वत्सल क्रिएशन सांस्कृतिक मंडळ नागपूरतर्फे ‘शुभमंगल सावधान’, जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेतर्फे ‘हिय्या’ या एकांकीका सादर करण्यात येणार आहे.
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद नागपूर महानगर शाखे तर्फे क्षितीजाच्या पलिकडे, पंडीतगुरू पार्डीकर नाटयशास्त्र महाविद्यालय शिरसाळा तर्फे ऊरूस, यतीन क्रिएशन पुणे तर्फे आता पास, मैत्री कलामंच डोंबिवली मुंबई तर्फे मुखवटे, रंगोदय रूपांतर मुंबई तर्फे युग्मक, अस्तीत्व मेकर्स सोलापूर तर्फे ब्रेन, द ग्रेट मराठा थिएटर रत्नागिरी तर्फे अनोळखी, अश्व थिएटर्स मुंबई तर्फे तो पाऊस आणि टाफेटा, संक्रमण पुणे तर्फे साकव, आमचे आम्ही पुणे तर्फे द कॉन्शन्स, अभिनय कल्याण मुंबई तर्फे या एकांकीका सादर होणार आहे.
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होईल. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणा-या एकांकीकेला ५० हजार रू. रोख व चंद्रपूर करंडक प्रदान करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाच्या एकांकिकेला ३० हजार रूपये रोख व स्म़ती चिन्ह, तृतिय क्रमांकाच्या एकांकिकेला २० हजार रूपये रोख व स्म़ती चिन्ह अशी पारितोषीके प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दिग्दर्शन प्रथम १० हजार रूपये, द्वितीय ७ हजार रूपये, तृतीय ५ हजार रूपये आणि स्म़ती चिन्ह. पुरूष अभिनय, स्त्री अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत संयोजन यासाठी अनुक्रमे ५ हजार रूपये, ३ हजार रूपये, आणि २ हजार रूपयांची प्रथम, द्वितीय, तृतिय क्रमांकाची पारितोषीके देण्यात येतील. सर्वोत्कृष्ट नवोदित लेखनाला ५ हजार रूपयाचे, सर्वोत्कृष्ट बालकलावंताला २ हजार रूपयाचे तर सर्वोत्कृष्ट रंगभूषाकाराला ३ हजार रूपयाचे विशेष पारितोषीक देण्यात येणार आहे. प्रत्येक विजेत्याला स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या एकांकीका स्पर्धेत सहभागी होणा-या कलावंतांमधील प्रतिभांना चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची संधी मिळावी या उद्देशाने सदगुरू फिल्म प्रॉडक्शन हाऊस तारांगण फिल्म निगडी पुणे तसेच शेखर नाईक प्रॉडक्शन या दोन चित्रपट निर्मीतीच्या क्षेत्रातील नामांकित संस्था टॅलेंट सर्चसाठी सदर एकांकिका स्पर्धेत तीनही दिवस सहभागी होणार आहे. तसेच या स्पर्धेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी टीव्ही ९ ही वृत्तवाहिनी मीडिया पार्टनर म्हणून योगदान देणार आहे. ही स्पर्धा चंद्रपूरकर नाट्यरसिकांसाठी निःशुल्क राहणार आहे. स्पर्धेला सिने नाट्य सृष्टीतील तीन नामवंत व्यक्ती परीक्षक म्हणून हजर राहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या संघांची निवासाची व भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या स्पर्धेला तीनही दिवस चंद्रपूरकर नाटय रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे व स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आम्ही चंद्रपूरकर व शील प्रॉडक्शन या संस्थांतर्फे डॉ. जयश्री कापसे- गावंडे, अजय धवने, सुशील सहारे यांनी केले आहे.