९६ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार नावांचे प्रस्ताव
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९६ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रेमानंद गज्वी, गंगाराम गवाणकर, डॉ. विश्वास मेहेंदळे आणि श्रीनिवास भणगे यांच्या नावाचे प्रस्ताव आज ३० सप्टेंबर २०१५ ला अखेरच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले. त्यामुळे आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची चुरस सुरु असतानाच नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीचीही चर्चा काही दिवस रंगणार आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊन, संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात येणार आहे. त्या बैठकीवर आता नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींची नजर खिळली आहे.
अध्यक्ष पदासाठी नावे | सूचक | अनुमोदक |
प्रेमानंद गज्वी | जयवंत देसाई | संजीव वढावकर |
भगवान हिरे | मुकुंद कुलकर्णी | |
नांदेड शाखा
डॉ. विजयकुमार माहुरे |
नांदेड शाखा
सुरेश पुरी |
|
दिलीप जाधव | हर्षद तोंडवळकर | |
सुरेश पवार | संदेश पाटील | |
प्रा. दीपक देशपांडे | शोभा बोल्ली | |
गंगाराम गवाणकर | प्रदीप कबरे | गोविंद चव्हाण |
बोरीवली शाखा
प्रदीप कबरे |
बोरीवली शाखा
गोविंद चव्हाण |
|
संजय डहाळे | अरुण घाडीगावकर | |
मराठी नाट्य कलाकार संघ
प्रदीप कबरे |
मराठी नाट्य कलाकार संघ
शिवाजी शिंदे |
|
विश्वास मेहेंदळे | सातारा शाखा
शिरीष चिटणीस |
सातारा शाखा
शेखर कुलकर्णी |
श्रीनिवास भणगे | पुणे शाखा
सुरेश देशमुख |
पुणे शाखा
दीपक रेगे |