राज्यस्तरीय स्पर्धेत कल्याणची ‘सेल्फी’ द्वितीय; नागपूरची ‘मनुशोत्ती’ तृतीय
चंद्रपूर येथे २ ते ४ ऑक्टोबर असे तीन दिवस रंगलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्स मुंबईच्या ‘जुन जुलै’ने ५० हजार रु. रोख व ‘चंद्रपूर करंडक’ जिंकला. अभिनय कल्याणच्या ‘सेल्फी’ने ३० हजार रु. रोख व स्मृती चिन्ह असे दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले तर नागपूरच्या महालक्ष्मी जगदंबा महविद्यालयाने सादर केलेल्या ‘मनुशोत्ती’ने २० हजार रु. रोख व स्मृती चिन्ह असे स्वरूप असलेला सर्वोत्कृष्ट तृतीय पुरस्कार पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातील ३४ एकांकिका सादर झाल्या.
रंगकर्मी आणि रंगभूमी यांचे माता पुत्राचे नाते : डॉ. निशीगंधा वाड
रंगकर्मी आणि रंगभूमी यांचे नाते म्हणजे माता पुत्राचे नाते असते. नाटयचळवळ समृध्द व्हावी आणि ते करताना आपल्या ज्येष्ठांचा सन्मान व्हावा, त्यांच्या स्मृती जपाव्या यासाठी आम्ही चंद्रपूरकर आणि शील प्रॉडक्शन या संस्थांनी केलेले हे उत्तम आयोजन सांस्कृतिक संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने-नाटय अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी केले.
शील प्रॉडक्शन चंद्रपूर प्रस्तुत, आम्ही चंद्रपूरकर आयोजित ज्येष्ठ रंगकर्मी कै विलास उपाख्य नाना बोझावार स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘चंद्रपूर करंडक’च्या पारितोषिक वितरण सोहळयात डॉ. निशीगंधा वाड बोलत होत्या. यावेळी मंचावर परीक्षक सिने-नाटय लेखक, दिग्दर्शक संजय पवार, अभिनेते श्रीकांत देसाई, अभिनेत्री परि तेलंग, सिने निर्माता संजय सिंगलवार, राजा बोझावार, अमोल सिंगलवार यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत वयक्तिक पुरस्काराचे मानकरी खालील रंगकर्मी ठरलेत.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी राकेश जाधव यांना, द्वितीय पुरस्कार ‘सेल्फी’ या एकांकिकेसाठी अभिजीत झुंझारराव यांना तर तृतीय पुरस्कार मनोज डाळींबकर यांना पुण्याच्या ‘कॉन्शन्स’ या एकांकिकेसाठी प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयाचा प्रथम पुरस्कार ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी मयुरी देशमुख यांना, द्वितीय पुरस्कार ‘मनुशोत्ती’ या एकांकिकेसाठी अश्वीनी डिखोळकर यांना तर तृतीय पुरस्कार नागपूरच्या पूजा पिंपळकर यांना ‘क्षितीजाच्या पलिकडले’ या एकांकिकेसाठी देण्यात आला. विशेष लक्षवेधी अभिनेत्री हा पुरस्कार ‘सेल्फी’ या एकांकिकेसाठी सोनाली मगर यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार ‘विसाचं गणीत’ या एकांकिकेसाठी योगीता पवार, कॉन्शन्स या एकांकिकेसाठी श्रुती कुलकर्णी यांना देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयाचा प्रथम पुरस्कार ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी हर्षल गदरी यांना, द्वितीय पुरस्कार ‘कॉन्शन्स’ या एकांकिकेसाठी प्रणव जोशी यांना, तृतीय पुरस्कार जनतेशी भेट ‘माझी घडवा’ या एकांकिकेसाठी राजसिंह देशमुख यांना देण्यात आला. विशेष लक्षवेधी अभिनेता हा पुरस्कार ‘गोडाऊन’ या एकांकिकेसाठी गणेश देशमुख यांना देण्यात आला. ‘सायलेंट स्क्रीम’ या एकांकिकेसाठी अमित मुळे, ‘क्षितीजाच्या पलीकडले’ या एकांकिकेसाठी सचिन गिरी यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
उत्कृष्ट प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार ‘थेंबांचे टपाल’ या एकांकिकेसाठी चैतन्य थरकुडे यांना, व्दितीय पुरस्कार ‘मी कोण’ या एकांकिकेसाठी समीर तभाणे यांना तर तृतीय क्रमांक ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी निलेश सावंत यांना देण्यात आला. उत्कृष्ट पार्श्वसंगीताचा प्रथम पुरस्कार ‘थेंबांचे टपाल’ या एकांकिकेसाठी अभिजीत केळकर यांना, व्दितीय पुरस्कार ‘मी कोण’ या एकांकिकेसाठी अश्विनी डिखोळकर यांना तर तृतीय पुरस्कार ‘हॅलो जिंदगी’ या एकांकिकेसाठी गोरल पोहाणे यांना देण्यात आला.
उत्कृष्ट नेपथ्याचा प्रथम पुरस्कार ‘गोडाऊन’ या एकांकिकेसाठी विशाल बटुकर यांना, व्दितीय पुरस्कार ‘मनुशोत्ती’ या एकांकिकेसाठी स्मीथ डेरेल, तृतीय पुरस्कार ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी समीर तोंडवळकर यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट नाट्य लेखनाचा विशेष पारितोषीक ‘जुन जुलै’ या एकांकिकेसाठी राकेश जाधव यांना देण्यात आला. रंगभूषेचे विशेष पारितोषीक ‘मी कोण’ या एकांकिकेसाठी अश्वीन धांडे यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट बाल कलावंताचा विशेष पारितोषीक ‘डठ सुट भावना कुट’ या एकांकिकेसाठी तनया जाधव हिला देण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. जयश्री कापसे गावडे यांनी केले तर संचालन अजय धवने यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुशील सहारे, हेमंत गुहे, धनंजय धनगर, जगदीश नंदुरकर, रितेश चौधरी, राहुल दळवी, राहुल मेडपल्लीवार, नूतन धवने, मेघना शिंगरू, रोहीणी उईके, बबिता उईके, गायत्री देशपांडे, अंकुश दारव्हेकर, श्रेयस कापसे-गावंडे, बकुळ धवने, अपेक्षा वानखेडे, नेहा वानखेडे आदींनी अथक परिश्रम घेतले.
पुरस्कारप्राप्त एकांकिका