बदनाम मंटो, पुरुष, सॉल सोलो आणि न हि वैरेन वैरानि सादर होणार
एनसीपीएमध्ये हिंदी, मराठी आणि कोंकणी नाटयकृतींचा १२ ऑक्टोबरपासून तीन दिवसांचा ‘त्रिभाषा नाटय महोत्सव’ होत असून त्यात ‘बदनाम मंटो’, ‘पुरुष’, सॉल सोलो’ आणि ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालय; केंद्र शासनाचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर; महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दि.१२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील रंगरेज सरोकार या संस्थेचे ‘बदनाम मंटो’ हे हिंदी नाटक तर, मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी गोव्यातील कलारचना संस्थेचे ‘पुरुष’ हे मूळ फ्रेंच नाटकाचे कोकणीत रुपांतरीत नाटक त्याचप्रमाणे अपरांत संस्थेचे ‘सॉल सोलो’ हे नाटक सादर होणार आहे. बुधवार दि १४ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे राज्य नाटय स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम पुरस्कार मिळालेले ‘न हि वैरेन वैरानि’ हे नाटक सादर होणार आहे.
या सर्व नाटयकृती रोज सायं.६.३० वाजता एनसीपीएच्या एक्सपिरिमेंटल थिएटरमध्ये सादर होतील. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका नाटयप्रयोगाच्या दिवशी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध असतील असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.