झी टॉकीजला आले ४० लाखांहून अधिक फोन कॉल्स
झी टॉकीजने आयोजित केलेल्या ‘दाबा बोट मिळवा नोट’ या कॉन्टेस्टला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ४० लाखांहून अधिक फोन कॉल्स आले असून कॉल्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. स्पर्धेचं हे तिसरं वर्ष असून दर दिवशी या स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या २१ स्पर्धकांना रोख बक्षिस दिली जातात.
२१ सप्टेंबरपासून सुरु झालेली प्रश्नोत्तरावर आधारित ‘दाबा बोट मिळवा नोट’ ही कॉन्टेस्ट १८ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. ’या कॉन्टेस्ट अंतर्गत मराठी चित्रपटासंदर्भात प्रेक्षकांना प्रश्न विचारले जातात. सोमवार ते शनिवार सायं ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत व रविवारी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे प्रश्न प्रेक्षकांना विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं देण्यासठी ९५९५४३८४३८ आणि ९५९५६७३६७३ या नंबरवर मिसकॅाल द्यावा लागतो. दर तासाला जिंकणाऱ्या स्पर्धकाला रोख रक्कमेचे बक्षिसही दिले जाते.
‘दाबा बोट मिळवा नोट’ या स्पर्धेची प्रसिद्धी झी टॉकीज व झी समूहाच्या अन्य वाहिन्यांवरून आकर्षकरीत्या केली जात असून याच प्रसिद्धीतंत्रामुळे ही स्पर्धा अधिकाअधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहचावी यासाठी अनेक माध्यमांचा वापर केला गेला असून हॅथवेने या स्पर्धेच्या प्रसिद्धीत मोलाचा वाटा उचलला आहे.
मराठी सिनेसृष्टीच्या माध्यमातून दर्जेदार मनोरंजन करण्याचा झी टॉकीजचा मानस आहे. आगामी काळातही अनेक दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रमांची आखणी झी टॉकीजकडून करण्यात येत आहे.