नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत अभिनय कल्याणची ‘सेल्फी’ द्वितीय
ज्येष्ठ नाटककार कै. वसंत जाधव स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत जिराफ थिएटर्सच्या ‘जून जुलै’ने प्रथम क्रमांक पटकावला असून, अभिनय कल्याणची ‘सेल्फी’ द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
‘अ.भा.मराठी नाट्य परिषद’चे निरलस कार्यकर्ते, ज्येष्ठ नाटककार वसंत जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य परिषदेने ‘कै. वसंत जाधव स्मृती खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते.’ मुंबई, अहमदनगर, नागपूर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, या सहा केंद्रातून एकूण ७० एकांकिका प्राथमिक फेरीत सादर करण्यात आल्या. त्यातून निवडलेल्या १२ एकांकिकांची अंतिम फेरी २६ आणि २७ ऑक्टोबर २०१५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे घेण्यात आली. अंतिम फेरीसाठी भारत तांडेल, हेमंत भालेकर, विद्या करंजीकर, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभासाठी नाट्यसंमेलनाध्यक्ष फैय्याज, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्षा लता नार्वेकर, नियामक मंडळ सदस्य अशोक हांडे, विजय केंकरे, प्रफुल्ल महाजन. स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे व त्यांचे सहकारी सतीश लोटके, गीता सोमण आणि दिगंबर आगाशे तसेच रंगभूमीवरील मान्यवर कलाकार हे आवर्जून उपस्थित होते.
सविस्तर निकाल
१. निर्मिती प्रथम : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
२. निर्मिती द्वितीय : ‘सेल्फी’ : अभिनय, कल्याण
३. निर्मिती तृतीय : ‘द. काँशन्स’ : माय माऊली मातोश्री, रत्नागिरी
४. दिग्दर्शन प्रथम : राकेश जाधव : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
५. दिग्दर्शन द्वितीय : अभिजित झुंजारराव : ‘सेल्फी’ : अभिनय, कल्याण
६. दिग्दर्शन तृतीय : मयूर निमकर : ‘मुखवटे’ मैत्री कलामंच, डोंबिवली
७. पुरुष अभिनय प्रथम : राहुल शिरसाट : सेल्फी’ : अभिनय, कल्याण
८. पुरुष अभिनय द्वितीय : विशाल तराळ : माणुस माझं नाव : अद्वैत, अमरावती
९. पुरुष अभिनय तृतीय : प्रणव जोशी : ‘द. काँशन्स’ : माय माऊली मातोश्री, रत्नागिरी
१०. स्त्री अभिनय प्रथम : सोनाली मगर : ‘सेल्फी’ : अभिनय, कल्याण
११. स्त्री अभिनय द्वितीय : मयुरी देशमुख : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
१२. स्त्री अभिनय तृतीय : श्रुती कुलकर्णी : ‘द. काँशन्स’ : माय माऊली मातोश्री, रत्नागिरी
१३. सर्वोत्कृष्ट बालकलावंत : मानसी चव्हाण : ‘भोग’ ओम साई कलामंच, वसई
१४. लक्षवेधी अभिनेत्री : बागेश्री निंबाळकर : ‘साकव’ : संक्रमण, पुणे
१५. लक्षवेधी अभिनेता : मनोज डाळिंबकर : द. काँशन्स’ : माय माऊली मातोश्री, रत्नागिरी
१६. लेखन प्रथम : राकेश जाधव : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
१७. लेखन द्वितीय : स्वरदा बुरसे : ‘सेल्फी’ : अभिनय, कल्याण
१८. प्रकाशयोजना प्रथम :सौरभ काळपांडे : माणुस माझं नाव : अद्वैत, अमरावती
१९. प्रकाशयोजना द्वितीय :अमोघ कडके : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
२०. प्रकाशयोजना तृतीय :यश नवले : ‘मुखवटे’ : मैत्री कलामंच, डोंबिवली
२१. नेपथ्य प्रथम : समीर :’जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
२२. नेपथ्य द्वितीय : कैलास जाधव :’आसक्ती’ :रौ क्रिएशन, नाशिक
२३. नेपथ्य तृतीय : राजेश पवार :’भोग’ : ओम साई कलामंच, वसई
२४. संगीत प्रथम :पीयूष पुरोहित : माणुस माझं नाव : अद्वैत, अमरावती
२५. संगीत द्वितीय : कृष्णा : ‘भोग’ :ओम साई कलामंच, वसई
२६. संगीत तृतीय : विक्रम पाटील : ‘द. काँशन्स’ : माय माऊली मातोश्री, रत्नागिरी
२७. वेशभूषा व रंगभूषा प्रथम :…. : ‘भोग’ : ओम साई कलामंच, वसई
२८. वेशभूषा व रंगभूषा द्वितीय : मेघा जोशी / मनाली जाधव : ‘मुखवटे’ : मैत्री कलामंच, डोंबिवली
२९. वेशभूषा व रंगभूषा तृतीय : स्वाती देसाई : ‘आसक्ती’ : रौ क्रिएशन, नाशिक
३०. उत्तेजनार्थ अभिनय स्त्री :मानसी कापुरे : ‘भोग’ : ओम साई कलामंच, वसई
३१. उत्तेजनार्थ अभिनय स्त्री : अपूर्वा कुलकर्णी : ‘साधुच्या डोहात’ : मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
३२. उत्तेजनार्थ अभिनय स्त्री:सपना बाविस्कर:’एक होतं आटपाट नगर’ :डॉ. अण्णासाहेब जी.डी. पेंडाळे महाविद्यालय, जळगाव
३३. उत्तेजनार्थ अभिनय पुरुष : सुयोग गो-हे : आसक्ती : रौ क्रिएशन, नाशिक
३४. उत्तेजनार्थ अभिनय पुरुष : भूषण उंबरकर : माणुस माझं नाव : अद्वैत, अमरावती
३५. उत्तेजनार्थ अभिनय पुरुष : हषर्ल गढरी : ‘जून जुलै’ : जिराफ थिएटर्स
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या रंगमित्रांचे ‘रंगमैत्र’च्या वतीने हार्दिक अभिनंदन!