वैभव तत्ववादीची वेगळी भूमिका

मिस्टर सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादीसुद्धा शिवरायांचा मोठा भक्त आहे. शिवरायांवरचे आपले निस्सीम प्रेम दाखवण्याची पुरेपूर संधी त्याला त्याच्या आगामी ‘मिस्टर & मिसेस सदाचारी’ या फिल्ममध्ये मिळाली आहे. या लुकमुळे वैभवला त्याच्या पूर्वीच्या चोकलेट हिरोच्या ईमेजमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली आहे.
‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ सिनेमामध्ये शिवरायांवर आधारित ‘जगदंब’हे गाणेदेखील चित्रित केल असून, त्या गाण्यात वैभवने नृत्य केल आहे. .शिवरायांचा गौरव करणारे हे गाणे पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्यासाठी वैभवने जवळपास आठवडाभर तालीम केली होती. या सिनेमात वैभवसोबत प्रार्थनाही झळकेल, इंडियन फिल्म्स स्टुडियोज निर्मित आणि आशिष वाघ दिग्दर्शित ”मिस्टर & मिसेस सदाचारी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.