देश-विदेशातील कलाकृतींचे आर्टगेट गॅलरीत प्रदर्शन सुरु
कोलकातास्थित आर्टीसन या संस्थेने आयोजित केलेलं ‘डॉट ऍन्ड स्ट्रोक’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कलाप्रदर्शन मुंबईत आर्टगेट गॅलरी,पहिला माळा, सत्यम कलेक्शन्सच्या वर, ईरॉस सिनेमाच्या बाजूला, छेडा सदन बिल्डींग, ११५ जमशेटजी टाटा मार्ग, चर्चगेट येथे १३ डिसेंबरपासून सुरु झाले असून, ते १९ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
देश विदेशातील पंचेचाळीस कलाकार चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रं, सुलेखन तसंच डिजिटल आर्ट अशा विविध कलाप्राकारातील कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. याप्रदर्शनात भारताबरोबरच, युनायटेड किंगडम, कुवेत, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रियाइत्यादीदेशातील कलाकारांचा सहभाग असणार आहे.
पुर्वेकडील आणि पाश्चिमात्य देशातील कलांचा संगम या प्रदर्शनाच्या निमित्ताने होणार असून अनेक कलाकार आपल्या कुंचल्याच्या आणि कलात्मक हातांच्या सहाय्याने व्यक्त होणार आहेत.
या प्रदर्शनातअमीरभर, बी. जयलक्ष्मी, चंद्रशेखरदास, चिन्मयप्रधान, द्रिप्ता रॉय, फौद अल इमादी, हेतलशाह, इंगेबर्ग सिज, जान तुनिसन, जयंतखान, जॉनवेसर, कबरीबॅनर्जीमुखर्जी, लालूप्रसादशॉ, मधुमिताभट्टाचार्य, मेरीज्योसी बोरेनकॅम्प,नीतापाठारे, पीटरहेंड्रीक्स, पुसापती परमेश्वर राजू, प्रसनजीत सेनगुप्ता, राजीवसरकार, राजेंद्रप्रधान, रामानंद बंदोपाध्याय, रीनारॉय, रोमंस (मानसरॉय), शेखरकार, श्यामलमुखर्जी, श्रावंथी जुलूरी, सुब्रतदास, सुब्रतगंगोपाध्याय, सुब्रतपॉल, सुब्रतरॉयचौधरी, सुचारीता सिंग, सुदीपचंद्रा, सुहासरॉय, सुकांता दास, स्वपनदास, स्वर्नाली पौल,टीनागेश्वर राव, तन्मयबॅनर्जी, तनुश्रीचॅटर्जी, तपससरकार, टॉनहासेर्नार, वसीमकपूर, विल लोफ हे देश-विदेशातील प्रथितयश कलाकार भाग घेणार आहेत.