२ जानेवारीपासून रंगणार ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणा-या ५५व्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेची अंतिम फेरी येत्या शनिवारी (२ जानेवारी)पासून सुरू होणार असून, ती २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्यातील १८ आणि गोव्याचे एक अशा एकूण १९ सर्वोत्कृष्ट नाट्य कलाकृती बघण्याची संधी सलग दुसऱ्या वर्षी पनवेलकरांना मिळणार आहे.
हौशी रंगकर्मींना हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा गेल्या ५५ वर्षापासून घेण्यात येते. यंदा या स्पर्धेला स्पर्धकांचा विक्रमी प्रतिसाद लाभला.राज्यभरात वेगवेगळ्या केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीतून ३५५ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १९ नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यात महत्वाचे केंद्र म्हणून स्थान मिळवलेल्या पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही नाट्यस्पर्धा रंगेल.
मागच्यावर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीला मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेलकरांनी छान प्रतिसाद दिला होता. यंदा सर्वच नाटकांचे प्रयोग संध्याकाळी ७ वाजता होणार असल्याने हा प्रतिसाद या वर्षी वाढेल अशी अपेक्षा आहे.
अनेक नवे विषय, नव्या संहिता, जुन्या गाजलेल्या दर्जेदार नाटकांचा वेगळा आविष्कार, महाविद्यालयीन रंगभूमीवरून आलेले युवा रंगकर्मी, व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील महत्वाच्या रंगकर्मीचे स्पर्धेत सहभागी असणे हे यंदाच्या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांशी रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीमुळे पनवेल थेट जोडलेले असल्यामुळे या भागातल्या हौशी प्रेक्षकांचाही या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या स्तरावरच्या नाट्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
सविस्तर वेळापत्रक
२ जानेवारी : परभणीच्या तेजोमयी प्रतिष्ठान सेवा.संस्थेचे रविशंकर झिंगरे लिखित किशोर पुराणिक दिग्दर्शित ‘खंडहर’ हे नाटक सादर होईल.
३ जानेवारी : पंढरीनाथ पांढरे युवा कला अकादमी,ठाणेचे गिरीश कर्नाड लिखित दीपक सरोदे दिग्दर्शित ‘नाटक अग्नीचे पाऊस पाण्याचे’
४ जानेवारी : नवोदिता,चंद्रपूरचे अभिराम भडकमकर लिखित जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ सादर होईल.
५ जानेवारी : नक्षत्र बहुद्देशीय संस्था, नागपूरचे सलीम शेख लिखित-दिग्दर्शित ‘तीस तेरा’
६ जानेवारी :मुंबई महानगरपालिका कर्मचारी कलावंत संस्था, कलासाधनाचे सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘असुरवेद’
७ जानेवारी : मूळजी जेठा महाविद्यालय,जळगावचे हेमंत कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘नाना भोळे,१२,शनिपेठ’
८ जानेवारी : मोरया प्रतिष्ठान,मुंबईचे डॉ.सोमनाथ सोनवलकर लिखित-दिग्दर्शित ‘धुआँ’
९ जानेवारी : लोकरंग बहु.प्रतिष्ठान,औरंगाबादचे अजगर वजाहत लिखित गणेश शिंदे दिग्दर्शित ‘गोडसे @गांधी डॉट कॉम’ हे नाटक सादर होईल.
१० जानेवारी : लोकहितवादी मंडळ, नाशिकचे मुकुंद कुलकर्णी लिखित हेमंत देशपांडे दिग्दर्शित ‘या ही वळणावर’,
११ जानेवारी : कल्याण-डोंबिवली मनपाचे सुरेश पवार लिखित दिग्दर्शित ‘अस्वस्थ नायक’,
१२ जानेवारी : ध्यास,पुणे निर्मित श्रीकांत भिडे लिखित-दिग्दर्शित ‘अंधाराचे बेट’,
१३ जानेवारी :बसणी पंचक्रोशी ग्रंथालय,रत्नागिरीचे विजय बोंद्रे लिखित अमित पाटील दिग्दर्शित ‘मेन विदाउट शॅडोज’,
१४ जानेवारी : बृहन्मुंबई महानगरपालिका,प्रमुख कामगार अधिकारी (शहर)चे विजय तेंडूलकर लिखित बुद्धदास कदम दिग्दर्शित ‘बेबी’ सादर होईल.
१६ जानेवारी :अभिरुची,कोल्हापूरचे गिरीश कर्नाड लिखित जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित ‘बळी’,
१७ जानेवारी : अ.भा.म नाट्य परिषद,लातूर महानगर शाखा शैलेश गोजमगुंडे लिखित-दिग्दर्शित ‘मुक्ती
१८ जानेवारी : अ.भा.म. नाट्य परीषद,अमरावती शाखेचे अभिराम भडकमकर लिखित राजेश दरवणे दिग्दर्शित ‘सुखांशी भांडतो आम्ही’,
१९ जानेवारी : अॅक्टीव्ह ग्रुप,सांगलीचे इरफान मुजावर लिखित दयानंद नाईक दिग्दर्शित ‘वृंदावन’,
२० जानेवारी : आमचे आम्ही,पुणेचे अमेय दक्षिणदास लिखित मनोज डाळींबकर दिग्दर्शित ‘द कॉन्शन्स’
गोवा केंद्रावरील प्राथमिक फेरी ५ जानेवारीला संपणार आहे, तिथे विजेते ठरणार नाटक स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे २१ जानेवारीला होईल.
नाटक अग्नीचे पाऊस पाण्याचे
असुरवेद
नाना भोळे,१२,शनिपेठ
धुआँ
‘गोडसे @गांधी डॉट कॉम’
अस्वस्थ नायक
अंधाराचे बेट
सुखांशी भांडतो आम्ही
वृंदावन
‘द कॉन्शन्स’