‘गोंधळी’ चित्रपटातून पदार्पण
या कोलीवाडयाची शान आहे तुझं देऊलं.. या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले, लग्न असो, गणपती उत्सव, नवरात्री, दही हंडी कोणताही सांस्कृतिक महोत्सव असो हे गाणं हमखास वाजणार, या गाण्याच्या गायिका समृद्धी केणी यांनी नुकतेच ‘गोंधळी’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन करून त्यांनी मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे.
ब्ल्यू हेवन एंटरटेनमेंट आणि केदारनाथ मूव्ही मैजिक या निर्मितीसंस्थे अंतर्गत अमित काकडे निर्मित, के. वंदना दिग्दर्शित या चित्रपटाला जयप्रकाश एम.पी. यांचे संगीत लाभले असून गीते के. वंदना यांची आहेत.

समृद्धी केणी याबद्दल सांगतात की, या कोलीवाडयाची शान आहे तुझं देऊलं..च्या अभूतपूर्व यशानंतर मला अनेक ऑफर्स आल्या परंतु मला हवं तसं गाणं मिळत नसल्याने मी ते केले नाही परंतु निर्माते अमित काकडे जेव्हा माझ्याकडे गोंधळी चित्रपटाची गाणी घेऊन आले आणि सांगितले की देवीचे गाणे आहे तेव्हा मी नकार देऊ शकले नाही आणि विशेष म्हणजे मी या चित्रपटातुन पदार्पण करते आहे, यात माझे एकुण दोन गाणी आहेत, एक आदर्श शिंदे यांच्यासोबत आहे आणि दुसरे गाणे माझे सोलो गाणे आहे. आदर्श शिंदे यांच्यासोबत गाण्याचा अनुभव खुप छान होता, मला खात्री आहे की माझ्या पहिल्या हिट गाण्याप्रमाणे हे गाणेदेखील सुपरहिट होईल.