चाहत्यांनी स्थापन केले सईहॉलीक्स फॅन क्लब
फॅन्स हा सिलेब्रीटिजच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. जितका मोठा सुपरस्टार तितकीच मोठी त्याची फॅन्सची संख्या. आजपर्यंत बॉलीवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्रींचे फॅन क्लब असल्याचे आपण ऐकून आहोत, पण आता मराठी कलाकारदेखील मागे नाहीत.
मराठी चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचेदेखील संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो फॅन्स आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या अजूनच वाढतच चालली आहे.

नुकताच सईहॉलीक्सनी खास आपल्या लाडक्या अभिनेत्री साठी एक ईवेन्ट आयोजित केला ज्यामध्ये त्यांनी सईच्या हस्ते सईहॉलीक्सच्या लोगोचे अनावरण केले. हा लोगो पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव यांनी डिझाईन केला आहे. न संपणाऱ्या गप्पा, फुल ऑन मस्ती आणि धमाल हे एकंदर या कार्यक्रमाचे स्वरूप होते, पण या कार्यक्रमाचा मुख्य हायलाइट होता तो म्हणजे हृदयाजवळ सईहॉलीक्सचा लोगो प्रिंट केलेले टि – शर्ट्स.
सई त्यांच्यासाठी किती स्पेशल आहे हे व्यक्त करण्यात सईहॉलीक्स कुठेच कमी पडले नाही. सईच्या जबरदस्त फॅन्सनी दिलेलं हे अनोख सरप्राईज पाहून सई मात्र अगदी भारावून गेली. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा फॅन क्लब असणे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सईला असा फॅन क्लब लाभला आहे जो तिच्या वर मनापासून प्रेम करतो.सईने तिचा अप्रतिम अभिनय आणि ग्लॅमरस लुक्सने अनेक फॅन्सचे प्रेम मिळवले आहे आणि याहि पुढे तिच्यावर भरभरून प्रेम करणारे अनेक सईहॉलीक्स तिला मिळत राहो हीच सदिच्छा.