पडद्यामागचा विक्रम दहिया

‘गुरु’चे रीफ्लेक्टीव गॉगल्स आणि गुरुचे डायलॉग्स, त्याच बरोबर त्यांची उत्सुकता वाढवणारी अजून एक गोष्ट म्हणजे अंकुशने गुरु चित्रपटात केलेली जबरदस्त फायटिंग. फुल टू फिल्मी असलेल्या गुरुच्या कहाणीमध्ये फायटिंग मात्र खूपच चित्तथरारक आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या गुरूच्या ट्रेलरने सर्व प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, बंगीस्तान, क्या कुल हे हम ३ आणि अजून बरेच हिंदी चित्रपट त्याच बरोबर बेस्ट चान्स, सर्विंग टाईज या सारख्या इंटरनॅशनल चित्रपटातून अभिनेत्यांना फायटिंगच्या टेकनिक्स शिकावारा विक्रम दहिया गुरु चित्रपटात अंकुशचा अॅक्शन गुरु बनला.
अंकुशच्या प्रत्येक फाईट मूववरती यंग अँड टॅलेनटेड विक्रमने अगदी बारकाईने काम केले.मोठ्या पडद्यावर प्रत्येक अॅक्शन सीन हा खरा आणि तितकाच दमदार दाखवण्याची जबाबदारी याअॅक्शनगुरुउत्तम प्रकारे पार पडली आहे हे गुरुचा ट्रेलरला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादावरून कळून येते.ट्रेलर सारखाच पूर्ण चित्रपटातील अॅक्शन सिन्स बघताना प्रेक्षकांना धमाल येईल यात शंकाच नाही.