विनाशाकडे जाणा-या जगाला सावरण्याचा ध्यास
मंजुल भारद्वाज लिखित, दिग्दर्शित ‘अनहद नाद…’ या दीर्घांकाचे प्रयोग सुरु आहेत. असाच एक प्रयोग २० जानेवारीला पनवेलनजीकच्या शांतीवनात झाला. या प्रयोगाला अमरावतीचे ज्येष्ठ नाट्य अभ्यासक म. झि. गावंडे यांनी व्यक्त केलेल्या भावना…
”सृजनशील जीवन जगणं हेच मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक नाटक ‘अनहद नाद… (Unheard Sounds of Universe)चं ध्येय आहे.”
– म. झिं. गावंडे

‘वाँर अँड पिस ‘ हा विषय मांडतांना लिओ टाँलस्टाँय यांनी हाच विचार जगासमोर मांडला. जगाला शांततेची गरज आहे. मरतेवेळी डाँ. मार्टिन लुथर किंग यांनीसुद्धा शांततेचाच संदेश दिला. जग झपाट्याने विनाशाकडे जात आहे. पर्यावरण बिघडले. उत्पादन व पैशांच्या चढाअोढीत आम्ही स्वतःच स्वतःला खाईत ढकलत आहोत. हीच गोष्ट मंजुल भारद्वाज यांना खटकते आणि तशी नाटकं त्यांच्या लेखणीतून उतरतात.

सृजनशील जीवन जगणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. विनाशाकडे जाणा-या स्वार्थी जगाला सावरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आणि त्यांच्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !
-म. झिं. गावंडे,
आनंदयात्री (अमरावती )