२९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात
आई बाबा आणि साई बाबा शप्पथ।… हा डायलॉग ज्याच्यामुळे महाराष्ट्रात सूपर डूपर हिट झालेला दगडू आपल्याला पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. प्रथमेश परब आणि प्रियदर्शन जाधव यांचा गेस्ट अपियर्न्स बंध नायलॉनचे सिनेमात दिसणार आहे.
२९ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात त्यांची एक छोटीशी भूमिका आहे. झिरो हिट्स बॅनरचे निर्माते सुनिल चंद्रिका नायर, सीजी नायर तसंच जतिन वागळे यांचे दिग्दर्शन असलेल्या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता महेश मांजरेकर, सुबोध भावे, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टेक्नॉलोजीचा वापर वाढल्याने टेक्नोसॅव्ही होत जाणारी आजची पिढी आणि त्यामुळे भविष्यात माणसाच्या नातेसंबंधावर होणारा प्रभाव ‘बंध नायलॉनचे’ सिनेमात मार्मिक पद्धतीने मांडला आहे.