वायकॉम१८ मोशन पिक्चर्सच्या चित्रपटाचे ट्रेलर लॉंच
आपली हलकी – फुलकी झलक दाखवत…गेले कित्येक दिवस रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या वायकॉम १८ मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’ सिनेमाचा ट्रेलर लॉँच सोहळा संपन्न झाला.

हिंदी सिनेसृष्टीत आपली दमदार छवी उमटवल्यानंतर आता पोश्टर गर्लच्या निमित्ताने वायकॉम18 मोशन पिक्चर्स मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्याचे अजित अंधारे यावेळी म्हणाले. हा चित्रपट नक्कीच वायकॉमच्या पुढच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा पैलू ठरेल अशी अपेक्षा ही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
समीर पाटील दिग्दर्शित पोश्टर गर्ल हा सिनेमा येत्या १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पारगाव टेकवडे या विचित्र आणि विक्षिप्त गावाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पोश्टर गर्लची भूमिकेत सोनाली कुलकर्णी आपल्याला दिसणार आहे.‘एक नार, कैक बेजार’ अशी परिस्थिती असणाऱ्या या गावातले बेजार आहेत जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन, संदीप पाठक आणि अक्षय टंकसाळे…चित्रपटभर प्रेक्षकांना हसवणारा हा चित्रपट सिनेमागृहातून निघता निघता प्रेक्षकांच्या डोक्यात एक चांगला विषय देऊन जाईल यात शंका नाही.
“चित्रपटाचा विषय वेगळा असून या चित्रपटाच्या निमित्ताने नायिकाप्रधान चित्रपट मराठीत येत असल्याचा अभिमान सोनालीने व्यक्त केला…याविषयी पुढे बोलताना… या बदलाचा चेहरा मी आहे…याचा आनंद असल्याचे ती म्हणाली”. हेमंत ढोमे बऱ्याच दिवसांनी एक चांगली कथा घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटात हेमंत कथाकार, पटकथाकार आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
ऋषिकेश जोशी या चित्रपटात सूत्रधाराच्या भूमिकासाकारत आहेत ज्यांनी आपल्या भाचीच्या स्वयंवराचा डाव रचला आहे. आता या अतिउत्साही तरूणांपैकी नक्की कोणाच्या गळ्यात पडणार पोश्टर गर्लची माळ हे येत्या १२ फेब्रुवारीला कळेलचं…