‘तिचा उंबरठा’मधून येतोय मोठ्या पडद्यावर
‘का रे दुरावा’ फेम सुयश टिळकची फॅन फोलोविंग दिवसागणिक वाढतच चालली आहे.सुयशने त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्व प्रेक्षकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.प्रेक्षक वर्गात सुयश बद्दलचे क्रेझ इतके वाढले आहे कि नुकत्याच दादरमध्ये झालेल्या दैवज्ञ समाज रांगोळी स्पर्धेत राजन वैद्य यांनी एक सुयशचे सुरेख रांगोळी पोट्रेट काढले.
हे रांगोळी पोट्रेट आणि चाहत्यांचे असलेले प्रेम पाहून सुयश भारावून गेला. सुयशने या रांगोळीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले इतकच नव्हे तर राजन वैद्यचे मनापासून आभारदेखील मानले. सुयशचा हा विनम्रपणाच त्याच्या चाहत्यांना भावतो. लवकरच सुयशचा तिचा उंबरठा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि चाहते त्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी देखील तितकेच उत्सुक असतील यात शंकाच नाही. त्याला असेच चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत राहो हीच सदिच्छा.