‘झी नाट्यगौरव’ सोहळा १० एप्रिलला झी मराठीवर!

अनेक ज्येष्ठ कलावंतांनी सादर केलेल्या प्रसिद्ध नाटकांतील प्रवेशांनी या सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. येत्या १० एप्रिलला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मराठी नाट्यसृष्टीसह सामान्य प्रेक्षकही दरवर्षी ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट बघतात तो सोहळा म्हणजे झी नाट्यगौरव. नाट्यक्षेत्रात वर्षभर आपल्या कार्याची छाप सोडणा-या आणि विविध प्रयोग करणा-या रंगकर्मींच्या सन्मानाचा हा सोहळा. यावर्षी विनोदाचा गौरव अशी संकल्पना घेऊन सादर करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्यात ‘दोन स्पेशल’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट संगीत – अनमोल भावे, नेपथ्य – प्रदीप मुळ्ये, अभिनेता- जितेंद्र जोशी, दिग्दर्शक- क्षितीज पटवर्धन आणि सर्वोत्कृष्ट नाटक या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान अमृता सुभाषला ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकासाठी मिळाला.
रामकृष्ण नायक यांना जीवनगौरव पुरस्कार

यावेळी बोलताना रामकृष्ण नायक म्हणाले की, “आर्थिक अडचणींच्या काळातही अनेक मोठ्या कलाकारांनी लेखकांनी आणि प्रेक्षकांनीही मोलाची साथ दिली त्यामुळेच ही संस्था उभी राहू शकली. पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टींचा मोह टाळून अविरत सेवा हा एकच ध्यास ठेवून काम केलं. यशावर दावा न करता रंगभूमीची सेवा करणे हाच आम्ही धर्म मानला. सेवेला धर्माची बैठक दिल्यामुळे त्या सेवेचं आम्ही कधीही बाजारीकरण केलं नाही आणि रंगभूमीशी कायम इमान राखलं. त्याग, निष्ठा, श्रद्धा आणि सातत्य या च
तुःसूत्रीच्या आधारावर वाटचाल केली. आजच्या पिढीतील कलाकारांनी , नाटककारांनी ही वाट धरली तर रंगभूमी त्यांच्या पदरी कधीच अपयश टाकणार नाही याची मी खात्री देतो. आजवर रंगभूमीशी निष्ठा राखून केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे.” यावेळी त्यांनी वसंतराव कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, डॉ. श्रीराम लागू, सतीश दुभाषी यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.