१ एप्रिलला अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग

‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेच्या अभिवाचनाचा एक अभिनव प्रयोग प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे गेले काही महिने महाराष्ट्रभर करत आहेत. पेठे यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगालाही सर्वत्र जाणकारांकडून दाद मिळाली आहे. पेठेंनी या अभिवाचनाचे प्रयोग आजवर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, गडहिंग्लज, रत्नागिरी, बेळगाव येथे केले आहेत.
‘नाटकघर’ या संस्थेतर्फे होणाऱ्या या प्रयोगास मुंबईच्या ‘अस्तित्व’ या संस्थेचे सहाय्य लाभले आहे. या प्रयोगाची प्रकाशयोजना प्रदीप वैद्य यांनी केली आहे. प्रयोगाचा कालावधी दीड तास असून, त्याच्या प्रवेशिका प्रयोगाच्या आधी दोन तास नाट्यगृहावर उपलब्ध होतील.