जहांगीरमध्ये चित्रप्रदर्शन सुरु
पुणेस्थित तरूण रंगलेखक प्रकाश बोरुडे यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृतींचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे २९ मार्चपासून सुरु झाले असून ते ४ एप्रिल २०१६ पर्यंत सुरु राहणार आहे.


निसर्ग चित्रांचं रेखाटन करता करता मंदीरांचे घाट या उमद्या कलाकाराला आकृष्ट करीत गेले. बनारसच्या मनोहारी घाटांचंच दर्शन या प्रदर्शनात घडतं. निलरंगी आणि शेंदरी रंगांमध्ये आकंठ डुंबणारे हे घाट आपल्याला शांततेची आणि आध्यात्माची प्रचिती देत रहातात. या पुर्वीही चित्रकार प्रकाश बोरुडे यांनी भगवान गौतम बुद्ध, कोकण किनारे, मुंबईमधली ऎतिहासीक स्थळं अशा अनेक चित्रमालिका चित्रबद्ध केल्या आहेत. ग्रामिण पार्शवभूमी असतानाही या कलाकाराने देशभरातील सुप्रसिद्ध कलादालनांमध्ये २७ प्रदर्शनांव्दारे आपली कला रसिकांसमोर सादर केली आहे. त्यांच्या कलाकृतींना कलारसिकांनी भरभरून दाद दिली आहे.