लवकरच येणार रसिकांच्या भेटीला

समीर सदानंद पाटील निर्मित व चंद्रकांत दुधगावकर दिग्दर्शित ‘धिंगाणा’ हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर यांच्यासोबत रझा मुराद, अवतार गिल, शहाबाज खान, कुनिका हे बॉलीवूडचे कलाकारही या चित्रपटात आहेत. शशांक पोवार व अमित राज यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. हेमंत एदलाबादकर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. छायांकन आय गिरीधरन याचं असून कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचं आहे.
धमाल कथानक, कलाकारांची भन्नाट अदाकारी, ठेका धरायला लावणार संगीत असा करमणुकीचा सगळा मसाला असणारा ‘धिंगाणा’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल, असा विश्वास टीम धिंगाणाला आहे.