महोत्सवाचे पोस्टर आणि थीमचे अनावरण
दक्षिण आशियाचा आगळावेगळा फिल्म महोत्सव असलेल्या कशिश मुंबई इंटरनॅशनल क्विर फिल्म महोत्सवाने आपल्या ७व्या आवृत्तीत पदार्पण केले आहे, मुंबईत सोमवारी पोस्टरच्या फर्स्ट लुकचे अनावरण करुन हे पदार्पण करण्यात आले.

वेंडेल रॉड्रिक्सनी पोस्टरबद्दल सांगताना म्हटले, ‘यावर्षी कशिश पोस्टर डिझाइनच्या विजेत्याने कशिश क्विर फिल्म फेस्टिवल २०१६च्या मनस्थितीला दर्शवले आहे. आपल्याला मिळणारा शांतता आणि सुस्पष्टतेचा संदेशच नव्हे तर, फिल्म रिलच्या सादरीकरणामागची वैचारिक प्रक्रिया आणि आपल्या सभोवताल असलेल्या प्रेमाच्या सात छटांनी आकर्षकता आणली आहे. डिझाइनचा सर्वात मर्मस्पर्शी भाग म्हणजे प्रत्येक जण आपल्याला हव्या त्या व्यक्तीवर प्रेम करण्यास मुक्त आहे, हा संदेश होय. मी कशिश पोस्टर २०१६च्या विजेत्याला आणि महोत्सवाला शुभेच्छा देतो,’
पोस्टर स्पर्धेला जिंकल्यामुळे उत्साहित झालेला अजॉय म्हणाला, ‘फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरची एका खास समाजासाठी रचना करणे हे खरेतर एक व्यक्तीगत आव्हानाप्रमाणेच आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्यामुळे या मानांकित पुरस्काराला जिंकणे अतिशय अर्थपूर्ण आहे. यामुळे एलजीबीटी समाजासाठी योगदान देण्याचे मला व्यक्तीगत समाधान मिळाले आहे.”

गेल्या चार वर्षापासून कशिश इंटरनॅशनल पोस्टर डिझाइन स्पर्धा जागतिक पातळीवर साजरी केली जाणारी स्पर्धा बनली आहे. कशिशने जगभरातील डिझायनर्सना महोत्सवाच्या अधिकृत पोस्टरचे आणि महोत्सवाच्या ७व्या आवृत्तीचे “प्रेमाच्या ७ छटा” या थीमसोबत डिझाइन करण्यासाठी आमंत्रित केले होते. भारताचे अग्रणी फॅशन डिझाइनर पद्मश्री पुरस्कार विजेता वेंडेल रॉड्रिक्सनी अजॉयची अंतिम विजेता म्हणून निवड केली. अजॉयच्या पोस्टरचा होर्डिंग्ज, बॅनर, सिनेमा स्लाइड्स, डेलिगेट्स कार्ड, टी-शर्ट आणि कॅटलॉग कव्हरसाठी वापर केला जाणार आहे.
कशिश २०१६चे आयोजन २५-२९ मेदरम्यान लिबर्टी सिनेमा आणि आलियान्स फ्रेचाइस डे बॉंबे येथे केले जाणार आहे. महोत्सवाची थीम आहे “प्रेमाच्या ७ छटा”. मानवी भावनांचे सर्वोच्च स्वरुप म्हणून प्रेमाला सर्व प्रकारांमध्ये साजरे केले जाते, हे साजरीकरण संस्कृतीच्या आरंभापासून केले जात आहे- प्रेमभावनेच्या स्वरुपातील प्रेम किंवा इरॉस, मित्रत्व किंवा मित्रांमध्ये असलेले प्रेम, पालक आणि मुलामधले प्रेम, तरुण प्रेमींमधल्या प्रेमाच्या आरंभापासून ते वचनबध्द साथीदार होईपर्यंत टिकून राहिलेले प्रेम, मानवतेसाठीचे प्रेम, स्वत:च्या स्वत:चा स्वीकार आणि प्रेम. २०१६ची “प्रेमाच्या ७ छटा” ही थीम या उत्साहाला एकत्रीत करते.
सहसंस्थापक आणि सीओओ अंशुलिका दुबे म्हणाल्या, ”विशबेरी अनेक सृजनशील प्रोजेक्टसाठी खासकरुन चित्रपटांसाठी काऊड फंडिंग मंच आहे. आम्हाला सुंदर संकल्पनांवर काम करणा-या चित्रपट निर्मात्यांना मदत करण्याची इच्छा आहे खासकरुन असे लोक जे एलजीबीटी समाजासाठी आवाज ऊठवतात आणि समाजाच्या लैंगिक दृष्टीकोनाच्या चाकोरीबध्द संकल्पनांवर प्रश्न करतात. आमची कशिश २०१६सोबत असलेली भागीदारी या भावनेचे व्यक्तीकरण आहे.”
या सोहळ्याला मीस्टर गे इंडिया सुशांत दिवगीकर आणि फोक-रॉक कलाकार अलिशा पैस यांचे खास कार्यक्रम झाले. कशिशच्या सल्लागार समितीचे सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यामध्ये रंगमंच कलाकार डॉली ठाकोर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अरुणाराजे पाटील, विसलिंग वुडच्या अध्यक्षा मेघना घई पुरी आणि प्राध्यापक नंदिनी सरदेसाई यांनी हजेरी लावली.