पेपर क्विलिंग कलाकृतींचे १७ जानेवारीपासून प्रदर्शन
लोकमान्य सेवा संघाच्या कर्णबधीर शाळेत शिक्षिका असलेल्या संगीता गुळेकर यांच्या ‘कागदाची किमया’ या कागदापासून तयार केलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन १७ व १८ जानेवारी रोजी विलेपार्ले पूर्व येथील स्वा. सावरकर सेवा संघ येथे भरवण्यात येत आहे.
दोन महिन्यापूर्वी नेहरू सेंटरमध्ये संगीता यांच्या ‘किमया कागदा’ची या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन आणि मुलांना या कलेचे मार्गदर्शन पार्ल्यातील आणि उपनगरातील मुलांना कलावंताना मिळावे म्हणून सेवा संघ या संस्थेने संगीता गुलेकाराना खास निमंत्रित केले.गणपती, अंबाबाई, तुळजाभवानी अशी एकाहून एक सरस चित्र कागदाच्या सहाय्याने साकारलेली पाहून मन अचंबित होऊन जाते.
गरजेनुसार विविध रंग जाडी व पोट असलेल्या कागदाच्या पट्ट्या करून त्याला जुळवून मनात असलॆले चित्र साकारणे तशी अवघड कला. ही अवघड गोष्ट सहज साध्य करण्यासाठी संगीता यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.एकेक चित्र तयार करायला दोन दोन महिने लागतात अर्थात शाळेतील मुलांना शिकवण्याची जबाबदारी सांभाळून, शिकवणे पहिले मग आपली कला जोपासणे अशा पद्धतीने संगीता यांनी या कलाकृती पूर्ण केल्या आहेत.सावरकर केंद्राच्या पुष्प रचन विभागाचे कार्यवाह यशवंत जोशी यांच्या सहकार्यामुळे १७व १८ जानेवारी २०१५ रोजी हे प्रदर्शन पार्ल्यात भरतय. कलाप्रेमी रसिकांना आनंद देणारी ठरणार आहे.