६२ व्या कामगार नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ६२ व्या कामगार नाटय़ महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरीच्या ‘प्यादी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावित, नाटय़ व चित्रपट अभिनेत्री आशालता, मध्य रेल्वेचे मु?य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील, कल्याण आयु?त नरेंद्रसिंह नागभिरे, मंडळ सदस्य अशोक पराडकर, डॉ. चेतना दीक्षित, संघजा मेश्राम, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अॅड. देवेंद्र यादव, गजानन कराळे, ज्योती मिसाळ यांनी काम पाहिले.
दुसरा क्रमांक ‘लव्ह नेव्हर डाईज’ (कामगार कल्याण केंद्र, चिपळून) तर तृतीय क्रमांक ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला ऊर्फ कोलंबसला सापडलं ते काय होतं?’ (का.क. केंद्र. राबोडी, ठाणे) या नाटकांनी मिळवला. कामगार कल्याण केंद्र, खोपट, ठाणेच्या ‘दूर आहे क्षितिज’ आणि का.क. केंद्र, कुडाळ यांनी सादर केलेल्या ‘लेकूरे उदंड झाली’ या नाटकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठी प्रथम संतोष गार्डी (प्यादी), द्वितीय राहूल शिरसाट (पुरावाच काय आहे..), तृतीय शाम मांजरेकर (‘स्वामी तिन्ही जगाचा’ – का.क. भवन, विक्रोळी) यांना देण्यात आली. उत्कृष्ट महिला अभिनयासाठी प्रथम पूजा जोशी (प्यादी), द्वितीय विमल खांडेकर (काळोख देत हुंकार, का.क.केंद्र, वर्तकनगर, ठाणे), तृतीय : नेहा अष्टपुत्रे (पुरावाच काय..) यांना गौरवण्यात आले.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार विनोद वायंगणकर (प्यादी), द्वितीय : प्रभाकर मोरे (लव्ह नेव्हर डाईज), तृतीय अभिजित झुंजारराव (पुरावाच काय..) यांनी पटकालेत. उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम अशोक पालेकर (लव्ह नेव्हर डाईज), द्वितीय नंदकुमार भारती (प्यादी), तृतीय अमित इंदूलकर – (नियतीच्या बैलाला, का.क.केंद्र, शहाड) यांना तर उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी प्रथम रविंद्र साळूंखे/ योगेश मांडवकर (प्यादी) , द्वितीय अभिजित चव्हाण (पुरावाच काय..), तृतीय सुरेश राऊळ (लोककथा ७८, का.क.केंद्र, सावंतवाडी) यांना देण्यात आला. उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी प्रथम, विनयराज उपरकर (प्यादी), द्वितीय विराज जयवंत (पुरावाच काय.. ), तृतीत राजेश शिंदे (नियतीच्या बैलाला, का.क.केंद्र, शहाड) तर उत्कृष्ट नाटय़ लेखनासाठीचा पुरस्कार दीपेश सावंत (एक टप्पा आऊट, का.क.केंद्र, कुर्ला) यांनी पटकावला.