शेफ रणवीर ब्रार आणि गौतम मेहर्षींची ‘फूड ट्रिपिंग’
पूर्वीच्या राजा-राणींच्या पाकखान्यात काय शिजत असेल, तिथे कसले सुगंध दरवळत असतील, कोणते मसाले वापरले जात असतील याची कधी कल्पना केली आहे का? ‘लिव्हिंग फूड्झ’वर सुरू होणाऱ्या ‘फूड ट्रिपिंग’ या शोमधून भारतातील लोकप्रिय शेफ रणवीर ब्रार आणि गौतम मेहर्षी खाद्यप्रेमींना पश्चिम महाराष्ट्रातील सहा राजवाड्यांची शाही सफर घडवत आहेत.
३० मेपासून सुरू झालेल्या या शोमधून बलासिनोर, गोंडल, भावनगर, वाधवान, चुला आणि सावला या तत्कालीन राजघराण्यांचे राहाणीमान आणि त्यांचे मुदपाकखाने यात डोकावून पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

शेफ रणवीर आणि गौतम यांच्या या संस्मरणीय प्रवासाची सुरुवात महाराजा एक्स्प्रेस या जगातील एका अत्यंत आलिशान ट्रेनमधून झाली आहे. शाही राण्या आणि त्यांचे शाही खानसामे यांच्याकडून पाककृती जाणून घेण्याबरोबरच हे दोघे शाही कुटुंबाशी संवाद साधून एका राजघराण्याचा प्राचीन आणि मौल्यवान वारसा जपताना समकालीन भारतात त्यांचे काय स्थान आहे हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उदा. राजकुमारी बलासिनोर आलिया सुलतान बाबी या त्यांना जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या डायनासोर जीवाश्म आढळलेल्या ठिकाणाची सैर घडवून आणणार आहेत. शाही खानसामे आणि राण्या यांच्याकडून ते प्रथमच या घराण्यांनी अत्यंत जपून ठेवलेला हा पाककौशल्याचा ठेवा उलगडून दाखवत आहेत.
याबाबत अत्यंत उत्साहीत असलेले रणवीर ब्रार म्हणतात, “राजेशाही संस्कृती अनुभवण्याची मला नेहमीच इच्छा होती. ‘फूड ट्रिंपिंग’ या खाद्ययात्रेमुळे ती इच्छा पूर्ण झाली आहे आणि ही यात्रासुद्धा तितकीच आलिशान होती.”
“ज्या शाही पाहुणाचाराबद्दल भारतीय राजघराणी ओळखली जातात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला आणि त्यांचा इतिहास आणि पारंपारिक पाककृतींचा ठेवा जाणून घेण्याचे सद्भाग्यही आम्हाला लाभले.”, अशी पुष्टी शेफ गौतम यांनी जोडली.
पश्चिम भारतातील या शाही मुदपाकखान्यांवर त्यांच्या मालकांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो. या मुदपाकखान्यांमध्ये वापरण्यात येणारे घटक आणि पद्धती अत्यंत दूरच्या प्रदेशातून म्हणजेच पर्शिया, फ्रान्स, ब्रिटन, मंगोलिया आणि दक्षिणेतून घेण्यात आल्या आहेत. लिव्हिंग फूड्झवर ३० मे २०१६ पासून दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ८.३० वाजता या शाही सफरीचा आनंद घ्या. लिव्हिंग फूड्झबद्दल लिव्हिंग फूड्झ ही भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय २४ तास सुरू राहणारी फूड आणि लाइफस्टाइलवर आधारलेली वाहिनी असून या वाहिनीचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे. एस्सेल समूहाची मालकी असलेल्या लिव्हिंग एंटरटेनमेंट वाहिन्यांच्या ब्रॅण्डचा ही वाहिनी एक भाग आहे.
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइस लिमिटेड (झेडईईएल) यांच्यातर्फे देशभर या वाहिनीचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. लिव्हिंग फूड्झ ही वाहिनी सप्टेंबर २०१५मध्ये सुरू झाली असून पर्यटन, साहस आणि संस्कृतीमध्ये डोकावून पारंपारिक स्वयंपाकघराच्या सीमांमधून बाहेर पडून पदार्थांच्या सामाजिक स्तरात होत जाणारा बदल जाणून घेण्याचा प्रयत्न या वाहिनीतर्फे करण्यात येणार आहे. या वाहिनीवर दाखविण्यात येणारे नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या कार्यक्रमांनी ‘ व्हेअर फूड इज फन’ हे तत्वज्ञान अंगिकारले आहे. लिव्हिंग फूड्झ ही पहिली अशी वाहिनी आहे, जिथे जगभरात प्रवास करणाऱ्या भारतीय शहरी प्रेक्षकांच्या आवडीनिवडींना आकर्षित करणारे प्रिमिअम शो फॉरमॅट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संकल्पना यांचा संगम घडवून आणण्यात आला आहे. पर्यटन, साहस, संगीत, फ्युजन फूड, आंतरराष्ट्रीय पदार्थ आणि लाइफस्टाइलमधील ट्रेंड हे या कार्यक्रमांचे मुख्य घटक असतील. उपखंडातील उत्तमोत्तम आणि सर्वसामान्यपणे माहित नसणारे असे सांस्कृतिक चित्र या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
या वाहिनीत रणवीर ब्रार, कुणाल कपूर, रॉकी सिंग, मयुर शर्मा, गौतम मेहर्षी, विकी रत्नानी, मारिया गोरेटी, पंकज भडोरिया, अजय चोप्रा आणि राखी वासवानी यांच्यासारखे शेफ, रेस्टॉरंट मालक आणि खवय्यांचा समावेश आहे. अलीकडेच लिव्हिंग फूड्झने आपला फ्लॅगशिप शो ‘गंगा, द सोल ऑफ इंडिया’ या शोची सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री व निर्माती दिया मिर्झा प्रथमच दूरचित्रवाणीवर झळकली. दूरचित्रवाणी कार्यक्रमांप्रमाणेच विविध ठिकाणी विशेष कार्यक्रम आणि पदार्थ व संस्कृतीवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करून ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांशी जोडली जाणार आहे. या वाहिनीची सुरुवात झाल्यापासून या वाहिनीच्या प्रेक्षकांमध्ये अत्यंत वेगात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे या वाहिनीच्या अत्यंत आकर्षक व माहितीपूर्ण स्टाइल कंटेन्टमुळे या वाहिनीला ऑनलाइन चाहतेही लाभले आहेत.
लिव्हिंग फूड्झ या वाहिनीने टीव्हीवरील भारतीय लाइफस्टाइल आणि मनोरंजनाचा दर्जा उंचावला असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमुळे अनेक चाहते मिळवले आहेत आणि येत्या काही महिन्यांत असेच आणखी काही लक्षवेधी कार्यक्रम आणण्याचे आश्वासन देते.