हिंदी विश्वविद्यालयाचा नवा अभ्यासक्रम
जर तुम्हाला चित्रपट क्षेत्रात आपले करियर करायचे असेल तर वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीेय हिंदी विश्वाविद्यालयाने बारावीनंतर बी. वॉक.’ हा अभ्सासक्रम तयार केला आहे.
चित्रपट क्षेत्रात करियर करणा-या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून एक नवा आणि पूर्णपणे रोजगार देणारा हा अभ्यासक्रम असल्याचे विद्यापीठाने म्हंटले आहे. ‘फिल्म निर्मिती आणि मंच विन्यासमध्येे बी. वॉक.’ असे या अभ्सासक्रमाचे नाव आहे.
या अभ्यासक्रमाविषयी विश्वविद्यालयातील प्रदर्शनकारी कला विभागाचे अध्यक्ष प्रोफेसर सुरेश शर्मा यांनी सांगितले की, सध्या फिल्म इंडस्ट्री आणि टेलीविजन इंडस्ट्रीमध्ये रोजगाराची खूप मोठया प्रमाणात मागणी वाढलेली आहे. त्यांना तांत्रिकदृष्टया सक्षम मनुष्यबळाची गरज भासत असते. ही गरज लक्षात घेवून विश्वलविद्यालयाने हा नवा कोर्स सुरू केला आहे. यात प्रवेश घेतल्यावर पहिल्या वर्षी कॅमेरा आणि लाइटिंगचे तंत्र शिकविले जाते तर दुस-या वर्षात संपादनाची कला शिकविली जाते. अभ्यासक्रमाच्या तिस-या वर्षात डायरेक्शन म्हणजे निर्देशन कलेत पारंगत केले जाते. या कलांना सध्या बालीवुड आणि सिरीयल इंडस्ट्रीत हमखास कामाची हमी आहे, असेही प्रो. शर्मा यांनी स्पष्ट केले.
अभ्यासक्रमाचे वैशिष्टये असे की यात पहिले वर्ष पूर्ण केले तर सर्टिफिकेट दिले जाते, दुसरे वर्ष पूर्ण केले तर डिप्लोमा दिला जातो आणि तिसरे वर्ष पूर्ण केले तर बी.ए.ची डिग्री दिली जाते. विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार हा अभ्यासक्रम करू शकतो.
दुसरे असे की पाठ्यक्रमात प्रवेश घेण्याची किमान पात्रता ही बारावी उत्तीर्ण आहे. कोणत्याही विषयावर बारावी झालेला विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून असून, अधिक माहितीसाठी डॉ . सतीश पावडे यांच्याशी ९३७२१५०१५८ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.