गजानन ऑईलच्या ब्रँडिंगसाठी ‘अर्ची’ने लावली हजेरी
खाद्यतेलाचे ब्रँड असलेल्या गजानन ऑईल प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीओपीएल) ‘गो’च्या ब्रँडिंगसाठी खास आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ‘सैराट’मधील अर्चीने हजेरी लावली. चित्रपटातील एक डयलॉग बोलून सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तात निघून गेली.
शनिवारी झालेल्या एका खास समारंभात खाद्यतेलाचे ब्रँड असलेल्या गजानन ऑईल प्रायव्हेट लिमिटेडचे (जीओपीएल) ‘गो’चे लोन्चींग गजानन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक नितीन जाधव आणि सैराट चित्रपटाची राष्ट्रीय पारितोषिक विजेती रिंकु राजगुरुच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात जीओपीएलने सोयाबीन, सूर्यफूल आणि सरकी या तीन रिफाईन्ड तेलांचे उद्घाटन केले, जी संपूर्ण महाराष्ट्रात विभिन्न ठिकाणी उपलब्ध असतील.

हा समारंभ व्यावसायिक प्रतिष्ठानचा असला तरी, त्या कार्यक्रमाला रिंकूच्या उपस्थितीचे ‘येड’ लागले होते. ती मंचावर येताच मोबाईलचे कॅमेरे ऑन झाले होते. ती काय बोलते यासाठी उपस्थितांनी कानही टवकारले होते. पण ती जराशी लाजरी बुजरी होऊन ‘इंग्लिशमध्ये सांगू की…’ हा ‘सैराट’मधील लोकप्रिय डॉयलॉग बोलली आणि गजानन ग्रुपचे आभार मानून निघून गेली.
दरम्यान, समारंभाच्यावेळी, २०२० पर्यंत दरसाल ५०५० करोडचा विक्रीचा कंपनीचा मानस असल्याचे सांगून पुढील दोन वर्षात जेएनपीटीजवळ ६०० रिफायनरी सुरु करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
गजानन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक नितीन जाधव उद्घााटनाच्यावेळी म्हणाले, “हा उद्घाटन सोहळा आमच्या ’हेल्दी ऑईल, हेल्दी लिव्हिंग’शी आणि आमच्या दीर्घकालीन वाढत्या कार्यप्रणालीशी संलग्न आहे. आमच्या विकासाला पाठिंबा म्हणून येत्या काही वर्षात आम्ही अजून १ सुविधा जेएनपीटीजवळ पुरवत आहोत. तसेच, समुद्रसीमा पार करुन युएसए, अर्जेंटिना, ब्राझील आणि ईस्ट आफ्रिका पैकी एका देशांत उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ब्रँडेड सेगमेंटमध्ये शिरकाव झाल्याने पॅन इंडिया तत्त्वावरील विस्तार सुकर होणार आहे, असेही ते म्हणाले.
कंपनीची सुरुवात कच्चे तेल आणि खाद्यतेलाच्या रिफायनरी पुरवण्यापासून झाली असून, आता बीप्राप्ती-संकर्षण-शुद्धीकरणाच्या पहिल्यापासून अखेरपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये विकसित झालेली आहे. मिसेला रिफायनिंगला अनुसरुन कंपनी सिंगल स्टेज कॉटनसीड एक्सट्रॅक्शनच्या वैज्ञानिक संकर्षण पद्धतीचा अवलंब करीत आहे.
गजानन ऑईल प्रायव्हेट लिमिटेडबद्दल
गजानन ऑईल प्रायव्हेट लिमिटेडने, अमरावतीला १००० टीपीडीचे द्रावण, सोयाबीन, सरकी तेल शुद्धीकरण आणि ताड विभाजनाचे प्रत्येकी २०० टीडीपी आणि सरकी विभाजनाचे ४०० टीडीपी घेऊन एक नवे तेलसंकुल संपादित केले आहे. हे संकुल संपूर्ण महाराष्ट्राची खाद्यतेलाची गरज काही मर्यादेपर्यंत पुरवण्यासाठी कंपनीला उपयुक्त ठरणार आहे.