शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत मैफल
शनिवारी (११ जून २०१६) मयुर कॉलनी, कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये गायत्री सप्रे – ढवळे व अपर्णा पणशीकर या बहिणी आपली कला सादर करणार आहेत .

गायत्रीने आपले शास्त्रीय संगीताचे शिक्षण मीरा पणशीकर, डॉ. शोभा अभ्यंकर यांच्याकडून घेतले. सध्या पं. संजीव अभ्यंकर यांच्याकडे व उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण डॉ. शशिकला शिरगोपीकर यांच्याकडून घेत आहे.
अपर्णाने कै. पं. भास्करबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर परंपरेतील तालीम घेतली व मातोश्री मीरा पणशीकर यांच्याकडे जयपूर परंपरेची तालीम सुरु आहे. पद्मभूषण पं. छन्नुलाल मिश्रा यांच्याकडे उपशास्त्रीय प्रकारांचे शिक्षण घेतले.
या मैफिलीत तबला : हणमंत फडतरे, संवादिनी : कुमार करंदीकर व सुरेश फडतरे, पखवाज : पद्माकर गुजर, निवेदन : नीरजा आपटे यांची साथ संगत लाभणार आहे
हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता होणार असून, सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.