अश्मिता देशपांडेची मुख्य भूमिका;
सारा श्रवणची ‘ईश्कचा हॉर्न वाजला’वर धम्माल!
कॉलेजमधील तरुणाईचे भावविश्व रेखाटणा-या ‘यारों की यारी’ या चित्रपटात ‘ड्रीम पूर्ण करण्याचे स्ट्रगल दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप काही शिकायला मिळाले’ अशी भावना ‘यारों की यारी’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण करणा-या अश्मिता देशपांडे यांनी व्यक्त केली.
२४ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘यारों की यारी’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी अलीकडेच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अस्मिता यांनी ही माहिती दिली.
या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची गाणी असून, त्यात सॅडसाॅग,
रोमॅण्टिक आणि अॅटमसाॅगचाही समावेश आहे. त्यात मराठी मालिका आणि चित्रपटातील आघाडीची नायिका सारा श्रवणने ‘ईश्कचा हॉर्न वाजला’अॅटमसाॅगवर नृत्य केले असून, ते करताना खूप मजा आली, अशी भावना साराने व्यक्त केली.
अजित साळवे आणि अश्मिता देशपांडे हे नवोदीत तरुण कलाकार ‘यारों की यारी’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत ९० चे दशक गाजविणारी अभिनेत्री किशोरी शहाणे, मराठी मालिका आणि चित्रपटातील आघाडीची नायिका सारा श्रवण, मराठी चित्र-नाट्य सृष्टीमध्ये चरित्र भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे प्रसाद पंडित, माधव अभ्यंकर, अनिल गवस, जयराज नायर आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रंग ‘यारों की यारी’ मध्ये भरले आहेत. विनय भार्गव चित्रपटाचे दिग्दर्शक असून शेजू पॉल यांचे छायाचित्रण प्रेक्षकांना तरुणाईचा फ्रेश देतील, अशी माहिती निर्माते राहुल गौतम सातदिवे यांनी दिली.

महाविद्यालयात शिकणारे तरुण तरुणी सहज गंमत म्हणून चित्रपट तयार करण्याचे ठरवितात. त्यासाठी ते एका गावात जातात. त्या गावातील समस्या, राजकारण, तेथील प्रथा या अनुषंगाने या तरुणांना चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान विविध अनुभव येतात. अशा प्रकारे तरुणाईभोवती हे कथानक फिरते, असे चित्रपट निर्माते आणि चित्रपटाचे नायक अजित साळवे यांनी सांगितले. या चित्रपटाचे निर्माते राहुल गौतम सातदिवे यांनी तर स्वत: महाविद्यालयात शिकत असताना औरंगाबादच्या खोखडबर्डी या दुर्गम खेड्यात बोअरवेल प्रकल्प उभारुन गावकऱ्यांना कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करुन दिले. या प्रकल्पासाठी मित्रांच्या मदतीने राहुलने विविध गणेशोत्सव मंडळात दानपेट्य़ा ठेऊन निधी उभारला होता. राहुलचा अनुभव ‘यारों की यारी’ चित्रपटासाठी लाभदायक ठरला असे देखील अजित साळवे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदे दरम्यान ‘यारों की यारी’ चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी “चिटर” या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अजय फनसेकर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिया पाटील, हास्य अभिनेता अंशुमन विचारे, जेष्ठ अभिनेते जयराज नायर, फँशन डिजायनर चैताली डोंगरे, लायन्स क्लबच्या विजया जगदाळे, दीपक भागवत, प्रिटल-प्रॅटल संस्थेच्या स्मृती भालेराव असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.