सुपरस्टार अंकुश चौधरीची मुख्य भूमिका
महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याचा प्रेक्षकांनी उचलून धरलेला आणि बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग कलेक्शन करणारा चित्रपट ‘दगडी चाळ’ आता हिंदी भाषेत स्टार गोल्ड या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
अनेक दाक्षिणात्य सिनेमे हिंदी भाषेत डब होऊन प्रसारित होणे हि गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही आहे पण मराठी चित्रपटांना ही संधी खूप कमी मिळते आणि ती संधी आता मिळाली आहे दगडी चाळ या चित्रपटाला आणि हा चित्रपट आता ‘दगडी चॉल – एक बगावत’ या नावाने १२ जूनला रात्री ८ वाजता स्टार गोल्ड वाहिनीवर हिंदी भाषेत दाखवला जाणार आहे, त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांनादेखील या चित्रपटाचा आनंद घेता येईल.