राज्यस्तरीय पारितोषिकप्राप्त एकांकिकाची स्पर्धा
महानगरपालिका, नागपूर तथा अ.भा. मराठी नाटय परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर करंडक राज्यस्तरीय पारितोषिकप्राप्त एकांकिकाची स्पर्धा दि. ३ ते १० जुलैदरम्यान सायंटिफीक सभागृह नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक ०१ जानेवारी, २०१३ पासून आजतागायत कोणत्याही मराठी एकांकिका स्पर्धेत निर्मितीचे (१, २ वा ३) पारितोषिक प्राप्त एकांकिका विजेत्या संस्थेस या स्पर्धेत सादर करता येईल. यशस्वी स्पर्धकांना एकूण रुपये एक लाखपर्यंत सांघिक व वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वैदर्भीय संस्था तथा विदर्भातील महाविद्यालये यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांच्याकरिता ‘प्राथमिक फेरी’चे आयोजन दि. २६ जून२०१६ रोजी करण्यात आले आहे. प्रवेशिकेची अंतीम तारीख २५ जून अाहे.
सर्वच स्पर्धकांना प्रवेश फी (५००/-) व अनामत रक्कम (१०००/-) यांचे वेगवेगळे डी.डी. प्रवेशअर्जासोबत २५ जूनपर्यंत सादर करावे लागतील.
प्रवेशाकरीता अ.भा.मराठी नाटय परिषद नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर यांचेशी संपर्क साधावा (मोबाईल क्रमांक 9422108158 व 8983108158). तसेच महानगरपालिका,नागपूरचे संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in यावर ‘महापौर करंडक’ (NEW) येथे क्लिक करून संपूर्ण माहिती, प्रवेश अर्ज आणि नियमावली डाऊनलोड करून प्रिंट घेता येईल.
अर्ज सर्व दस्ताऐवजांसह अ.भा.मराठी नाटय परिषद नागपूर शाखेचे प्रमुख कार्यवाह यांचेकडे पोहचते करावे लागतील.
