मंगेशची मेहनत आली फळाला

ज्या अवलियावर प्रेक्षक गेली कित्येक वर्ष प्रेम करतात अशा नटाच्या चरित्रपटात त्याची भूमिका तंतोतंत वठवणं… एक मोठं आव्हान… हेच आव्हान मंगेश देसाई या अभ्यासू अभिनेत्याने लिलया पेललं आहे. याच परिश्रमांविषयी बोलताना अभिनेता मंगेश देसाई म्हणतो, शूटींग सुरू होण्यापूर्वी सुरू झालेला हा अभ्यास शूटींग संपेपर्यंत सुरू होता. आजचे शूटींग संपवून उद्या कोणता सीन आहे याची विचारणा करायची आणि कितीही उशीर झाला तरी घरी जाऊन त्या सीन्सची रिहर्सल करायची, असा मंगेश देसाईंचा दिनक्रम होता. केलेली मेहनत वाया जात नाही…हेच खरं…
चित्रपटाचा टीझर लाँच झाला आणि मंगेश देसाईंच्या मेहनतीला फळ मिळालं. चारी बाजूंनी या अभ्यासू अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचेही कौतुक झाले… आता प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती मंगलमूर्ती फिल्मस् आणि किमया मोशन पिक्चर्स यांच्या ‘एक अलबेला’ या चित्रपटाची… जो येत्या 24 जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.