नयन फाऊनडेशनच्या उपक्रमाची ‘लिम्का’ घेणार दखल

या कार्यक्रमात धर्मदाय उपआयुक्त सुवर्णा खंडेलवाल, समाजकल्याण आयुक्त अविनाश देवसाठवार, मुंबई महानगर पालिका साह्यक आयुक्त उदयकुमार शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नयन फाउंडेशन ही दृष्टिहीनांसाठी कार्यरत असणारी सेवाभावी संस्था असून, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. दृष्टिहीन मुलांना समाजात एक वेगळी ओळख प्राप्त व्हावी तसेच त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेली ७ वर्ष नयन फाउंडेशन काम करत आहे. आतापर्यंत नयनच्या वतीने दृष्टिहीन बांधवासाठी गिर्यारोहन, बुद्धिबळ स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, दृष्टिहीन विद्यार्थांचं पहिलं गोविंदा पथक असे विविध उपक्रम राबवले आहेत.

या कार्यक्रमात दृष्टिहीन मुलांचे विविध सादरीकरण बघायला मिळाली. त्यामध्ये गणेश वंदन, मल्लखांब, रोप-मल्ल खांब, जल-दीप आसन, क्रिया जल, व्युतक्रमा, व्यग्रकारिणी, नौली, अशा विविध योगाच्या क्रियांच प्रात्येक्षिके दृष्टिहीन मुलांनी सादर केली.