तमाशाप्रधान चित्रपटाचे चित्रीकरण कृष्णामाईच्या परिसरात पूर्ण


चित्रपटामध्ये हर्ष कुलकर्णी, सुबोध भावे, सुवर्णा काळे, शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव आदी कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाची अदाकारी पहाता येईल.
चित्रपटाची कथा, गीते आणि दिग्दर्शनाची धुरा ज्येष्ठ दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी सांभाळली आहे. संगीत प्रवीण कुंवर यांचे असून छायांकन जितेंद्र आचरेकर यांनी केले आहे. दाक्षिणात्य नृत्यदिग्दर्शक सुजितकुमार यांच्यासह दीपाली विचारे यांनी प्रेक्षकांना ताल धरायला लावणाऱ्या नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे. अनुभवी कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांच्या कल्पक कलादिग्दर्शनातून ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट बनला आहे. ‘छंद प्रितीचा’च्या निमित्ताने प्रेक्षकांना बऱ्याच अवधीनंतर आशयघन संगीतमय तमाशापटाचा आस्वाद घेता येईल.
