चित्रपटाला सिनेरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘सैराट’च्या धुंवाधार कमाईनंतर अतुल जगदाळे यांच्या ‘विजयते एंटरटेनमेंट’ निर्मित आणि ‘इरॉस इंटरनॅशनल’ प्रस्तुत ‘गणवेश’ हाऊसफुल्लच्या सरींनी चिंब भिजलाय. त्याचा आनंद टीम गणवेश पावसाच्या सरींसोबत साजरा करीत आहे.


राज्यात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला आणि पावसानेही अचानक जोर धरला, त्यामुळे आमच्यात प्रेक्षक येतील का? याबाबत बरीच धाकधूक होती, पण हृदयाला भिडणाऱ्या ‘गणवेश’ला प्रेक्षक नक्कीच दाद देतील याची खात्री होती, आमचा हा विश्वास रसिकांनी सार्थ ठरावीत अभूतपूर्व प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी व्यक्त केली आहे.

गणवेशवर प्रेक्षक भरभरावून प्रेम करीत राहतील असे अभिनेत्री स्मिता तांबे यांनी व्यक्त केले.
‘गणवेश’ हा चित्रपट महाराष्ट्रात जवळपास २५० चित्रपगृहांमध्ये दररोज ४५० खेळामध्ये प्रदर्शित झाला आहे. नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम, अभिनेत्री स्मिता तांबे, तन्मय मांडे, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर इत्यादी कलावंततांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.


