चित्रपट पहा आणि ७ जुलैपर्यंत निबंध पाठवा
गणवेश या शब्दाला अभिमान, आदर आणि कर्तव्यदक्षता अशा अर्थाचे पदर जोडलेले आहेत. गणवेश आपल्या आयुष्यात वयासोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक अर्थांनी बदलत जातो. ‘विजयते एन्टरटेन्मेंट’ निर्मित आणि अतुल जगदाळे दिग्दर्शित ‘गणवेश’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला असून विद्यार्थ्यांवर संस्कारासोबत त्यांच्या विचारांना नवी चालना देणारा ठरत आहे. या चित्रपटावर ‘माझा गणवेश’ ही राज्यस्तरीय निबंधमाला आयोजित करण्यात आली आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना चित्रपट, त्याचा विषय कसा वाटला? तुम्ही कोणता बोध घेतला? यावर निबंध लिहायचा आहे. ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे. ५ वी ते ७ वीच्या मुलांनी निबंध २०० ते २५० शब्दांमध्ये लिहायचा असून, ८ वी ते १० वीच्या मुलांनी तो ४०० ते ५०० शब्दांमध्ये पूर्ण करायचा आहे. ही स्पर्धा फक्त ७ जुलैपर्यंतच असून या निबंध स्पर्धेसाठी एकूण १५ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
अल्टियस सॉफ्ट कंपनीचे ऑनलाइन मीडिया स्पेशलिस्ट समीर भोसले आणि त्यांची टीम गणवेशसाठी सोशल मीडियावर नवनव्या कल्पना राबवून तरुणाईला आकर्षित करीत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवास करणारा ‘गणवेश’ शाळेतल्या प्रत्येक मुलाने पहिलाच पाहिजे, कारण यातून त्या मुलाला आयुष्यभरासाठी एक प्रेरणा मिळणार असून गणवेशाचा आदर, अभिमान आणि जबाबदारी याचं भान त्याच्यामध्ये येणार आहे.

शिक्षकांनीही मुले आणि पालकांसोबत हा चित्रपट पहावा कारण मुलांना प्रेरित करण्यासाठी तेच सर्वप्रथम त्यांच्या आयुष्यात येणारा घटक आहेत. लहानपणी या शिक्षकांनी आम्हाला आमच्या पालकांसोबत ‘गणवेश’ चित्रपट दाखविला होता ही आठवण विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीची आनंददायी ठेव असणार आहे.
हा चित्रपट २४ जूनपासून सर्वत्र गर्दीत सुरू आहे. ‘विजयते एन्टरटेन्मेंट’ या संस्थेने ‘गणवेश’ची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे निर्मिती दिग्दर्शनात ‘गणवेश’सोबत पदार्पण केले आहे. लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे. ‘गणवेश’ला आघाडीचे गायक नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे, तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत किशोर कदम, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.