‘गमावणे-गवसण्याचा’ प्रवास २९ जुलैला सिनेमागृहांत
‘लॉस्ट अँड फाऊंड’ या मराठी चित्रपटाच्या इंग्रजी नावावरूनच कमालीची उत्सुकता निर्माण झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर आता धूम करतो आहे. १ जुलैला या ट्रेलरचे समारंभपूर्वक लॉन्चिंग झाल्यानंतर ते व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटरवर फिरायला लागले आहे. हा बहुचर्चित चित्रपट २९ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
ट्रेलर

दिवसेंदिवस शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे आणि या माणसांच्या गर्दीतली माणसं मात्र गर्दीत एकाकी आहेत ! हा विरोधाभास जरी वाटत असला, तरी हेच सत्य आहे. जागतिक पातळीवर, ‘depression rate ‘ , भारतात सर्वाधिक असून अगदी फेसबुक, व्हॉट्स अपच्या, ‘व्हर्चुअल गर्दीत’सुद्धा माणूस एकटा पडलाय! एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवं असतं, त्याचं हे ‘एकटेपण’, ऐकून घेणारा आणि ‘हो मी समजू शकतो’ म्हणणारा कोणी एक !

चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या एकाकीपणातूनच त्यांची प्रेमकथा सुरू होते का? त्यांनी आपापल्या आयुष्यात काहीतरी गमावलाय का? जे गमावलंय ते त्यांना गवसतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला २९ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘लॉस्ट अँड फाऊंड ‘ या अत्यंत हटके आगामी चित्रपटात मिळतील.

निर्माते विनोद मालगेवार यांनी या ‘हटके’ चित्रपटाची निर्मिती केली असून ‘गमावण्याचा आणि गवसण्याचा’ प्रवास लेखक ऋतुराज धालगडे यांनी चित्रपटाच्या कथेत इतका सुंदरपणे मांडला आहे की प्रत्येक जणच या चित्रपटाशी समरस होईल. शिवाय कथेबरोबर पटकथा आणि संवाददेखील धालगडे यांनी लिहिले असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या कथेला योग्य तो न्याय देण्यासाठी सिध्दार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई आणि डॉ. मोहन आगाशे या कलाकारांबरोबर अजूनही काही दिग्गज कलाकार आपल्याला या चित्रपटाच्या कथानकात भेटतील.
विशेष म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि डॉ. राहुल देशपांडे यांनी चित्रपटाची श्रवणीय गाणी लिहिली असून शुभांकर यांनी लयबद्ध संगीत दिलं आहे.
चित्रपटाचं छायाचित्रीकरण रमेश भोसले यांनी केलं आहे आणि संकलनाची जबाबदारी जितेंद्र डोंगरे यांनी पार पाडली आहे. अत्यंत उत्सुकता निर्माण करणारा असा हा चित्रपट असून चित्रपटांप्रमाणेच आपल्यालाही आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात गमावलेलं, गवसता येईल पण त्यासाठी मात्र वाट पहावी लागेल २९ जुलैची!
ट्रेलर लाँचची छायांकित झलक