३० जुलैपर्यंत संहिता पाठवण्याचे आवाहन
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या ‘प्रबोधक या संस्थेने मराठी कलावंतांच्या लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी एकांकिका लेखन स्पर्धा केली आहे.
सर्व लेखकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रबोधकने केले आहे.
नियम, अटी व तपशील
१) एकांकीका नवीन असावी, कुठेही सादर झालेली नसावी
२) एकांकीकेच्या ३ प्रती पाठवाव्यात
३) एकांकीकेसोबत लेखकाने एक पत्र पाठवावे, ज्यात “ही एकांकिका माझी आहे व कोणत्याही पुस्तकावर किंवा कलाकृतीवर आधारलेली नाही” असे लिहावे. असल्यास मूळ लेखकाचे परवानगी पत्र देणे बंधनकारक आहे.
४) स्पर्धा शुल्क : ३०० आहे. चेक किंवा रोख द्यावे. चेक “Harshad Mane Foundation” या नावाने पाठवावा.
५) प्रथम पारितोषिक रु. ३०००/- द्वितीय पारितोषिक रु. २०००/- तृतीय पारितोषिक रु. १०००/-
६) पारितोषिक स्वरुप : रोख रक्कम व सन्मानपत्र
७) दिनांक ३० जुलैपर्यंत एकांकीका खालील पत्त्यावर पाठवावी एकांकीका पाठवण्याचा पत्ता : Prabodhak. C/O Harshad Mane, soares building, Ground Floor, off Road no. 5, Jogeshwari east. Mumbai : 400060. Phone : 9967706150
अधिक माहितीसाठी संपर्क : 9967796254 / www.prabodhakformumbai.in