कला अकादमीत चार दिवस अहोरात्र ‘काव्यहोत्र’

गेल्या वर्षी पाहिले काव्यहोत्र २३ ते २५ जुलै २०१५दरम्यान घेण्यात आले होते. सलग ५२ तास रंगलेल्या या काव्यहोत्रनंतर यावर्षीच्या दुसऱ्या महोत्सवाची घोषणा अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांनी केली.

यंदा अखंड काव्यवाचनाचा गेल्या वर्षीचा ५२ तासांचा रेकॉर्ड मोडीत काढायचा विचार असून, गोवा कला अकादमीच्या ४ स्थळांवर एका पाठोपाठ एकेका ग्रुपचे कविता सादरीकरण म्हणजे अविस्मरणीय अनुभव असेल.
काव्यहोत्र सन्मान
यंदाच्या काव्यहोत्रमध्ये जीवनभर काव्याची साधना केलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवीला २ लाख रुपयांचा ‘काव्यहोत्र’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे विष्णू वाघ यांनी सांगितले
दोन पदार्पण सन्मान
महोत्सवात कवितेचे पहिले पुस्तक घेऊन साहित्यक्षेत्रात प्रवेश केलेल्या एका कवीला व एका कवयित्रीला २५ हजार रुपयांचा ‘पदार्पण सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
या काव्यहोत्रमध्ये २५ भाषांतील ५०० कवी सहभागी होतील असा अंदाज व्यक्त होत असून, ज्या कवींना या महोत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी पुढे दिलेल्या लिंकवरील ऑनलाईन फॉर्म भरावा. तो फॉर्म १० जुलैच्या आधी पाठवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने अरुण म्हात्रे, ड़ॉ. मंगेश बनसोड, सुरेश कुमार वैराळे, श्रीनिवास नार्वेकर, मधुसूदन नानिवड़ेकर व भालचंद्र कुबल (७७३८७०१४२३) यांनी केले आहे.