अंधशाळेच्या विद्यार्थिनींनी केले चित्रपटाचे संगीत प्रकाशन


एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्याना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयाभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
गेली अडीच वर्ष समीर आणि त्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. खूपच उत्तम असे संगीत मयुरेश केळकर याने दिले असून तो नक्कीच कौतुकास पात्र आहे. आजवर आम्ही निर्मित केलेल्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच Accessibility Format चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आशय सहस्त्रबुद्धे या आमच्या मित्राने या विषयात पी. एच.डी. केली असून, या चित्रपटासाठी सध्या तो यावर काम करीत आहे. आजवर हा प्रयोग बॉलिवूडमध्येदेखील झाला नसून ‘चौर्य’ चित्रपटाच्या माध्यमातून हा पहिला मान मराठी सिनेसृष्टीला मिळणार असल्याने आम्हाला याचा नक्कीच सार्थ अभिमान आहे. अंध आणि कर्णबधीरांनादेखील या अभिनव प्रयोगामुळे चित्रपटचा आनंद हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे घेता येईल, असे निर्माते नीलेश नवलखा यांनी सांगितले.

‘चौर्य’ हा माझा पहिला चित्रपट आहे. नीलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये रस दाखविल्याने तसेच काही क्रिएटिव्ह गोष्टींच्या मार्गदर्शमुळे हा चित्रपट अधिकच रंजक झाला आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य की हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण हे राजस्थान येथील चंबळ येथे करण्यात आले आहे, असे दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितले.

चौर्य चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. अभिनेते किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
श्रीशैल हिरेमठ आणि जितेंद्र पंडित यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून, केतन माडीवाले याने या चित्रपटाचे संकलन केले आहे. राज ङगर यांचे कलादिग्दर्शन असून भक्ती नाईक व गणेश चंदनशिवे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.